Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ४६ - मिशन २०१७; विजयनगर प्रभागातून हे आहेत इच्छुक


Main News

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४६, विजयनगरमधून सुशील मिरगल, उमेश गुंड, छाया पाटील, दिनेश नढे, सज्जी वर्की आणि सुरेश पाटील हे इच्छुक आहेत. या सर्वांनी “पीसीबी टुडे”च्या “मिशन २०१७; चर्चा तर होणारच” या उपक्रमात सहभाग घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याविषयी…

 
सुशील महादेव मिरगल
सुशील मिरगल ३३ वर्षांचे असून, ते कला शाखेचे द्वितीय वर्ष उत्तीर्ण आहेत. त्यांनी आयटीआय केला असून थरमॅक्स कंपनीत काम करतात. पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे ते उपाध्यक्ष आहेत. तसेच ओमकार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत. कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविता येत नसल्यामुळे त्यांना नगरसेवक व्हायचे आहे. प्रभागातील सांडपाणी व्यवस्था सक्षम करण्यासाठी तसेच विकासकामांवर होणारा वायफळ खर्च रोखण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
 
उमेश शिवाजी गुंड
३२ वर्षांचे असलेले उमेश गुंड बारावी उत्तीर्ण आहेत. सध्या ते पदविकेच्या अभ्यासक्रमाला आहेत. त्यांचा ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे. ते मराठवाडा विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच नरेंद्र मोदी विचार मंचाचे ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. प्रभागाच्या सर्वांगिण विकासाचा मुद्दा घेऊन आपण निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. सक्षम सांडपाणी व्यवस्था, चांगले रस्ते, चांगली शाळा, नागरिकांना पुरेशा पाण्याचा पुरवठा, स्मशानभूमीत सोयी सुविधा, बसथांबा आणि स्वच्छतागृह तसेच करदात्यांच्या पैशांचा नाहक होणारा खर्च रोखण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
 
छाया नितीन पाटील
छाया पाटील या गृहिणी आहेत. त्यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झाले असून, त्या २९ वर्षांच्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी त्या काम करत आहेत. याशिवाय पोलिस दक्षता समिती आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ अन्नधान्य वितरण समितीच्या त्या सदस्या आहेत. त्याचप्रमाणे स्त्री शक्ती महिला बचत गटाच्या अध्यक्षा आणि संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदही त्या सांभाळत आहेत. विद्यमान नगरसेवकांनी न केलेली कामे करण्यासाठी त्यांना नगरसेवक व्हायचे आहे. नगरसेवक झाल्यास महिलांसाठी स्वच्छतागृह, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि महिलांना रोजगार मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
दिनेश ज्ञानेश्वर नढे
दिनेश नढे हे वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. त्यांच्या स्वतःचा व्यवसाय आहे. नवरत्न मित्र मंडळ आणि शिवशक्ती मित्र मंडळाचे ते सदस्य आहेत. प्रभागातील मैदानाचे आरक्षण विकसित करणे, पवनानगर येथील आरक्षणाची जागेतील घरे वाचविणे, प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, मोफत वायफाय सुविधा पुरविणे आणि गुंडगिरीला आळा घालण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
 
सज्जी वर्की
सज्जी वर्की हे पदविकाधारक आहेत. ते ४५ वर्षांचे असून, त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे सरचिटणीस आणि लायन्स क्लब पिंपरी गोल्डचे ते अध्यक्ष आहेत. प्रभागात मैदानासाठी आरक्षित असलेल्या जागेत मोठ्या प्रमाणात घरे झालेली आहेत. हे मैदान अर्धा एकर जागेत विकसित करून घरे वाचविण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे ते म्हणाले. प्रभागात रोजच्या रोज साफसफाई, रोजच्या रोज कचरा उचलणे, नदीची स्वच्छता आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
 
सुरेश बबन पाटील
सुरेश पाटील हे विज्ञान शाखेचे पदवीधर असून त्यांचा मेडिकलचा व्यवसाय आहे. ते ४२ वर्षांचे आहेत. पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाचे ते चिटणीस आहेत. तसेच चिंचवड विधानसभा संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य, सप्तश्रुंगी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक आणि खान्देश एकता मंचचे अध्यक्ष आहेत. माजी नगरसेविका ललिता पाटील या त्यांच्या भगिनी आहेत. प्रभागातील अनधिकृत बांधकामे नियमित करणे, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, वाहतूककोंडी सोडविणे, नदीच्या सुशोभिकरणासाठी पाठपुरावा आणि प्रभागात विकासाचा मॉडेल तयार करण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin