Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ४५ - पिंपरी वाघेरे प्रभाग बनला कोंडवाडा; नगरसेवकांचा मात्र सर्वांगिण विकास


Main News

>> नगरसेवकांना सर्व महत्त्वाची पदे मिळूनही प्रभाग राहिला विकासापासून वंचित
>> नगरसेवकांमध्ये विकासाच्या दृष्टीचा अभाव
 
पिंपरी, दि. १० (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ४५, पिंपरी वाघेरेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दोन्ही नगरसेवकांना महापालिकेची सर्व महत्त्वाची पदे मिळाली. त्यातून प्रभागाचा विकास होण्याऐवजी नगरसेवकांचा डोळे दिपतील असा विकास झाला. प्रभाग मात्र विकासाविना आजही कोंडवाडाच राहिला आहे. जलतरण तलवाच्या मुद्द्यावर प्रभागात गेल्या २० वर्षांपासून राजकारण सुरू आहे. मात्र आजतागायत काम पूर्ण झालेले नाही. नगरसेवकांना विकास कशाला म्हणतात हेच माहिती नसल्यामुळे प्रभागात कोणताच विकास होऊ शकलेला नाही. प्रभागात येणाऱ्या संजय गांधीनगर झोपडपट्टीकडे नगरसेवकांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे या प्रभागातील इच्छुकांनी केला. तसेच या प्रभागाच्या आगामी निवडणुकीत खऱ्या इतर मागासवर्गांना न्याय मिळण्याची गरज असल्याचे काही इच्छुकांनी सांगितले.
 
उपमहापौर प्रभाकर वाघेरे आणि नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी सभापती आणि माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या पत्नी उषा वाघेरे हे प्रभाग क्रमांक ४५, पिंपरी वाघेरेचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या प्रभागातून संदिप वाघेरे, अमर कापसे, पूनम कापसे, महादेव वाळूंजकर आणि ईश्वर कुदळे हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. प्रभागात पाण्याचा प्रश्न बिकट आहे. कमी दाबाने पाणी येते. सोसायट्यांना उन्हाळ्यात टँकरने पाणी मागवावे लागते. वाढती लोकसंख्या गृहित धरून पाणीपुरवठ्याची क्षमता वाढविण्यात आलेली नाही. प्रभागात भूमीगत सांडपाणी व्यवस्था आहे. परंतु, पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणत्याही व्यवस्था केली गेलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात जागोजागी पाणी साचलेले असते. नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानात पाण्याचे तळे तयार होते. त्यामुळे रस्त्यावरही पाणी येते. गेल्या कित्येक वर्षांपासून हीच परिस्थिती असून, नगरसेवक त्यावर कोणतीच उपाययोजना करत नसल्याचे इच्छुक म्हणाले.
 
प्रभागात कचऱ्याचा फार मोठा प्रश्न नाही. परंतु, प्रभागातील काही भागात टाकलेला कचरा उचलला जात नाही. वाघेरे कॉलनी, ग्रामस्थांचे दैवत असलेल्या मरिआई मंदिराजवळच कचऱ्याचा ढिग लागलेला असतो. प्रभागातील विद्युत व्यवस्था चांगली आहे. परंतु, एलईडी दिवे बसविताना नगरसेवकांनी दुजाभाव केला आहे. व्होट बँक असणाऱ्या ठिकाणीच एलईडी दिवे बसविले आहेत. प्रभागात रस्त्यांचा आणि आरक्षणांच्या विकासाचा फार मोठा बिकट प्रश्न आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार रस्ते केले गेले नाहीत. त्यामुळे पिंपरी वाघेरे प्रभाग म्हणजे कोंडवाडा झाला आहे. अरूंद रस्त्यांमुळे प्रभागात वाहतूककोंडी होते. गेल्या चार वर्षांत रस्त्यांचे डांबरीकरण झाले नाही. आता निवडणूक जवळ आल्यामुळे डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. महापालिकेच्या योजना प्रभागातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्या जात नाहीत, असे इच्छुकांनी सांगितले.
 
प्रभागातील वैभवनगरचा ६० मीटरचा रस्ता टीडीआरच्या मोबदल्यात ताब्यात घेऊनही तो केला गेलेला नाही. त्यावरून लोकांची केवळ दिशाभूल केली जाते. अन्य काही रस्त्यांचा ताबा देऊनही त्यांचा विकास केला जात नाही. प्रभागात उभारण्यात येत असलेल्या जलतरण तलावाच्या मुद्द्यावर गेल्या २० वर्षांपासून राजकारण सुरू आहे. महापौर, स्थायी समिती सभापती आणि उपमहापौर ही सर्व पदे या प्रभागाच्या नगरसवेकांनी उपभोगली. परंतु, जलतरण तलावाचा प्रश्न काही सुटलेला नाही. पूररेषेत बांधलेल्या या जलतरण तलावाला रस्ताच नाही. खासगी रस्ता देऊनही नगरसेवकाने केलेल्या श्रेयवादामुळे हा रस्ता सध्या बंद आहे. रस्ताच नसेल, तर महापालिकेने जलतरण तलाव उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च का केले?, असा सवाल इच्छुकांनी उपस्थित केला.  
 
प्रभागात मैदान, शाळा, उद्यान या सर्वांसाठी आरक्षणे आहेत. परंतु, त्यांचा विकास होत नाही. काही आरक्षणांचा ताबा महापालिकेने घेतलेला नाही. नगरसेवक संबंधित जागा मालकाशी संवाद साधून जागा ताब्यात घेण्यास पुढाकार घेत नाहीत. महापालिकेने १९७८ मध्ये बांधलेले भैरवनाथ मंदिर पडण्याच्या अवस्थेत आहे. प्रभागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच नाही. पीसीएमटी अस्तित्वात असताना प्रभागाच्या अंतर्गत भागातून बस वाहतूक व्यवस्था उपलब्ध होती. परंतु, आता एकही बस अंतर्गत भागातून जात नाही. प्रभागातील स्मशानभूमी लोकवस्तीत आहे. ती रद्द करून मैदानाचे आरक्षण असलेल्या जागेत स्मशानभूमी उभारता आली असती. परंतु, नगरसेवकांच्याकडे “विकासाचे व्हिजन” नाही. केवळ श्रेयवादाचे राजकारण करण्यात नगरसेवक पटाईत आहेत. नगरसेवकांनी सर्व महत्त्वाची पदे घेऊन स्वतःचा विकास साधला आहे. नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळे प्रभाग ग्रामपंचायत काळासारखाच आजही कोंडवाडाच राहिला आहे, अशी खंत इच्छुकांनी व्यक्त केली. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin