Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ४५ - मिशन २०१७ ; पिंपरी वाघेरे प्रभागातून हे आहेत इच्छूक


Main News

पिंपरी, दि. १० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४५ असलेल्या पिंपरी वाघेरेमधून संदिप वाघेरे, महादेव वाळुंजकर, ईश्वर कुदळे, अमर कापसे व पूनम कापसे या निवडणूक इच्छूकांनी "पीसीबी"च्या "मिशन २०१७ ; चर्चा तर होणारच" या उपक्रमात सहभाग घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याविषयी...

संदिप बाळकृष्ण वाघेरे
४० वर्षीय संदिप वाघेरे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी कला शाखेच्या व्दितीय वर्षापर्यंतचे शिक्षण घेतले आहे. २०१२ ची महापालिका निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर लढविली होती. तेव्हा ते तिसऱ्या क्रमांकावर होते. स्वतःचा उत्कर्ष न करता पिंपरीगावच्या विकासासाठी आपल्याला नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक झालो तर महापालिका निधी बरोबरच आवश्यक त्या ठिकाणी स्वखर्चाने नागरी सुविधा प्रकल्प उभारु, असेही ते म्हणाले. इगल मित्र मंडळ व संदीप वाघेरे युवा मंचच्या माध्यमातून ते विविध उपक्रम राबवत असतात. 

महादेव निवृत्ती वाळुंजकर
वाळुंजकर यांचा प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. त्यांचे वय ४९ असून ते कला शाखेचे पदवीधर आहेत. काँग्रेसचे ते माजी शहर सरचिटणीस आहेत. ते विशेष कार्यकारी अधिकारी असून पिंपरी-चिंचवड नाभिक समाजाचे उपाध्यक्ष आहेत. २०१२ च्या महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, माघार घेतली. प्रभाग स्वच्छ व सुंदर व्हावा, पिंपरीतील रेल्वेवरील उड्डाणपुलाचा प्रश्न सोडविणे, पिंपळे सौदागर ते पिंपरी उड्डाणपूल तसेच सांस्कृतिक भवनाची उभारणी करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. 

ईश्वर नामदेव कुदळे 
ईश्वर कुदळे हे राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचे संगणक प्रशिक्षण केंद्र आहे. त्यांचे वय ३६ असून ते बीकॉम झाले आहेत. सावता सहयोग मंडळातही ते कार्यरत आहेत. २०१२ ची महापालिका निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढविली होती. त्यावेळी त्यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. हा प्रभाग ओबीसी राखीव आहे. त्यामुळे खऱ्या मागास प्रवर्गातील उमेदवाराला येथून संधी मिळावी, अशी त्यांची आग्रही भुमिका आहे. मागासवर्गीय समाजाला त्यांचे हक्क मिळवून देणे हे आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. 

अमर अशोक कापसे 
कापसे जिजामाता रुग्णालय प्रभाग अथवा पिंपरी वाघेरे प्रभागातून इच्छूक आहेत. ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव आहेत. शहर सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. जाणिव फाऊंडेशनचे ते अध्यक्ष आहेत. त्यामाध्यमातून ते विविध उपक्रम राबवितात. त्यांचे वय ३७ असून ते मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. महापालिका निवडणुकीसाठी ते स्वतः प्रथमच इच्छूक आहेत. नागरिकांना नगरसेवक म्हणजे काय त्याची व्याख्यान समजून देणे व महापालिका प्रशासन व नागरिकांमधील दुवा म्हणून काम करण्यासाठी आपल्याला नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. अशोक थिएटर प्रभागाला 'स्मार्ट प्रभाग' बनविण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. 

पूनम अमर कापसे
पूनम कापसे या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पिंपरी विधानसभा अध्यक्षा आहेत. त्यांचे वय ३५ असून त्या एमकॉम झालेल्या आहेत. सिध्दी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या त्या संचालिका आहेत. ५० महिला बचतगटांचे त्यांनी संघटन केले आहे. २०१२ ची महापालिका निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढविली होती. त्यावेळी आलेले अपयश भरुन काढण्यासाठी आता त्या जोमाने तयारीला लागल्या आहेत. प्रभागातील महिलांचे व्यवसाय प्रशिक्षण व रोजगाराच्या माध्यमातून सबलीकरण, त्यांच्यासाठी कौशल्य विकासाचे उपक्रम राबविणे, स्मार्ट प्रभागाची निर्मिती, मूलभूत सोई-सुविधांची पूर्तता करण्यासाठी आपण निवडणूक लढवू इच्छित असल्याचे त्यांनी सांगितले. जिजामाता प्रभाग अथवा पिंपरी वाघेरे प्रभाग यापैकी संधी मिळेल तेथून त्या निवडणूक लढविणार आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin