Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ६४ - दापोडी-बोपखेल प्रभागात दापोडीचा परिसर राहिला विकासापासून वंचित


Main News

>> नगरसेविका २५ वर्षांपासून प्रतिनिधीत्व करत असूनही विकासाचा पत्ता नाही
>> बोपखेलमध्ये लष्कर हद्दीतील रस्त्याचा प्रश्न आणि आरक्षणांचा रखडला विकास
  
पिंपरी, दि. २ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ६४, दापोडी-बोपखेलमध्ये चार वर्षांत कोणताही विकास झालेला नाही. दोन्ही नगरसेवक दापोडी भागातील असूनही या परिसरातील झोपडपट्ट्या विकासापासून वंचित राहिल्या आहेत. नगरसेविका गेल्या २५ वर्षांपासून या भागाचे नेतृत्व करत आहेत. परंतु, दापोडी परिसराचा विकास तर दूरच स्वतःच्या घरासमोरचा विकासही त्यांना करता आलेला नाही. बोपखेल परिसरातील आरक्षणांच्या विकासाकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले आहे. जागांचा ताबाही घेण्यात आलेला नाही. लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्याचे या प्रभागातील इच्छुकांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संजय काटे आणि रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे हे प्रभाग क्रमांक ६४, दापोडी-बोपखेल प्रभागाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या प्रभागातून चेतन घुले, गोपाळ मोरे, भाग्यदेव घुले आणि विनय शिंदे हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. दापोडी परिसरात चार झोपडपट्ट्या आहेत. यातील अनेक झोपडीधारकांना पाणीच मिळत नाही. आजूबाजूच्या प्रभागात जाऊन रिक्षांनी पाणी आणावे लागते. नागरिकांच्याकडून पाण्याची वारंवार तक्रार होते. परंतु, आजतागायत हा प्रश्न सुटलेला नाही. या भागात पाण्याची स्वतंत्र टाकी उभारण्याची गरज आहे. बोपखेल परिसरात पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत असल्याचे इच्छुकांनी सांगितले.

दापोडी परिसरात सांडपाणी व्यवस्था आणि पाणीपुरवठ्याची पाइपलाइन शेजारी-शेजारी टाकण्यात आली आहे. त्यामुळे सांडपाण्याची पाइपलाइन फुटून अनेकदा या भागातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होतो. या भागात सांडपाणी व्यवस्थेची नवीन कामे करण्यात आली आहेत. परंतु, जादा क्षमतेच्या पाइपलाइन बदलून कमी क्षमतेच्या पाइपलाइन टाकण्यात आल्या आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये अनेक ठिकाणी आजही खुली गटारे आहेत. बोपखेल भागात भूमीगत सांडपाणी व्यवस्था आहे. परंतु, सांडपाणी मैलाशुद्धीकरण प्रकल्पाला जोडण्यात आलेले नाही. ते थेट नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे नदी प्रदूषणाचा मुद्दा गंभीर झाला आहे. बोपखेलच्या ७० टक्के भागात भूमीगत विद्युत व्यवस्था आहे. दापोडीतील झोपडपट्ट्यांमध्ये कोठेही भूमीगत विद्युत व्यवस्था नाही. वीजवाहिन्या सहज हात लागेल, एवढ्या उंचीवर आहेत. त्यामुळे विजेचा झटका बसून अनेकांचे जीवही गेले आहेत, असे इच्छुकांनी सांगितले.

बोपखेल भागातील कचरा गोळा करण्यासाठी दररोज घंटागाड्या येतात. परंतु दापोडी भागात घंटागाड्या कमी असल्यामुळे दररोजचा कचरा गोळा होत नाही. नागरिक मोकळी जागा दिसेल तिथे आणि रेल्वेमार्गालगत कचरा टाकतात. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. दापोडीतील झोपडपट्टी परिसरात सहा ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. त्यांची वेळच्या वेळी साफसफाई होत नाही. साफसफाईचे काम नगरसेविकेच्या जवळच्या ठेकेदाराला दिल्यामुळे नागरिकांना त्याला जाबही विचारता येत नाही. गुलाबनगरमध्ये रेल्वेमार्गालगत तब्बल ३२ लाखांचे स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. परंतु, त्याला १० लाखही खर्च झाले नसतील, अशा निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. केवळ भिंती उभ्या करून बाहेरच्या बाजूने टाइल्स लावण्यात आल्या आहेत. आतमध्ये निकृष्ट दर्जाचे काम करून वरून स्लॅब टाकण्यात आले आहे, असे इच्छूक म्हणाले.

बोपखेल भागातील रस्त्यांचे विकास आराखड्यानुसार रूंदीकरण झालेले नाही. गेल्या चार वर्षांत केवळ एकदाच रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. बहुतांश रस्त्यांचा ताबा महापालिकेकडे आहे. त्यामुळे रस्त्यांच्या रुंदीकरणाला वाव असून, तसे प्रयत्न व्हायला हवेत. दापोडी भागातील रस्त्यावरून चालू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न बोपखेलवासीयांसाठी सर्वात महत्त्वाचा आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडली आहे. परंतु, सध्या त्याबाबत सकारात्मक पावले पडत असल्याने हा प्रश्न सुटेल, असा बोपखेलवासीयांना आशावाद आहे. बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. काही रस्ते सिमेंटचे करण्यात आले आहेत. परंतु, ते निकृष्ट दर्जाचे झाल्याने एकाच पावसात त्यांची दुरवस्था झाली आहे. सिद्धार्थनगर परिसरातील संपूर्ण रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत, असे इच्छुकांनी सांगितले.

बोपखेल भागात शाळा, मैदान, पोलिस चौकी, विरंगुळा केंद्र, मैलाशुद्धीकरण प्रकल्प व इतर सार्वजनिक प्रयोजनसाठी अनेक आरक्षणे आहेत. परंतु, शाळा वगळता एकाही आरक्षणाचा ताबा महापालिकेने घेतलेला नाही. आरक्षणांचा विकास न झाल्याने बोपखेलचाही विकास खुंटला आहे. दापोडी भागात सार्वजनिक प्रयोजनासाठी एकही आरक्षण नाही. सिद्धार्थनगर, जयभीमनगर, रामनगर आणि गुलाबनगर या चारही घोषित झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होण्याची आवश्यकता आहे. परंतु, येथील नागरिकांना कमीत कमी ५०० चौरस फुटाचे घर मिळावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे गेल्या २५ वर्षांपासून या भागाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. परंतु, त्यांना या भागाचा विकास करता आलेला नाही. दापोडीमध्ये गुन्हेगारी आणि अवैध धंदे वाढले आहेत. सीएमईच्या प्रवेशद्वारासमोर उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव नगरसेवकांतील श्रेयवादामुळे रखडला आहे. रेल्वेमार्गावर उड्डाणपूल बांधण्याचाही प्रश्न नगरसेवकांना सोडविता आलेला नाही, असे इच्छुकांनी सांगितले. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin