Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ६४ - मिशन २०१७ ; दापोडी-बोपखेलमधून हे आहेत इच्छूक


Main News

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६४, दापोडी-बोपखेल प्रभागातून चेतन घुले, गोपाळ मोरे, भाग्यदेव घुले आणि विनय शिंदे हे इच्छूक आहेत. या सर्वांनी “पीसीबी टुडे”च्या “मिशन २०१७; चर्चा तर होणारच” या उपक्रमात सहभाग घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल….
 
चेतन गोवर्धन घुले 
चेतन घुले हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती आहेत. ते ३६ वर्षांचे असून, वाणिज्य शाखेचे पदवीधर आणि बांधकाम व्यावसायिक आहेत. ते महापालिका निवडणुकीसाठी प्रथमच इच्छुक आहेत. बापुजीबुवा उत्सव समितीचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे ते सदस्य आहेत. लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या बोपखेलच्या रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक झाल्यास बोपखेलमधील आरक्षणे विकसित करणे, इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणे आणि चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
 
भाग्यदेव एकनाथ घुले
भाग्यदेव घुले हे २६ वर्षांचे असून, ते कला शाखेचे पदवीधर आहेत. भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष, अखिल भारतीय दहशतवाद विरोधी संघटनेचे उपाध्यक्ष, भोसरी पोलिस ठाणे शांतता समितीचे सदस्य, सात सामाजिक संस्थेचे सदस्य आणि विघ्नहर्ता न्यासचे सदस्य म्हणून ते काम करत आहेत. प्रभागातील दारूचे गुत्थे बंद करणे, महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, लष्कराच्या हद्दीतील रस्त्याचा प्रश्न सोडविणे, प्रभागातील मुलभूत सोयी सुविधा सक्षम करणे आणि गोरगरीबांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
 
गोपाळ प्रकाश मोरे
गोपाळ मोरे हे ३० वर्षांचे असून, त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. गोपाळ मोरे युथ फाऊंडेशनचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी रेश्मा मोरे २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेद्वार होत्या. प्रभागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, वीज, रस्ते, पाणी आणि अन्य मुलभूत सोयी सुविधा नागरिकांना पुरविणे, या सोयी सुविधा सक्षम करणे आणि दापोडी परिसरात भूमीगत विद्युत व्यवस्था करण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले
 
विनय अशोक शिंदे 
विनय शिंदे हे ३५ वर्षांचे असून, ते पदवीधर आहेत. दापोडी परिसरात गेल्या २५ वर्षांत कोणताही विकास झालेला नाही. येथील नागरिकांना मुलभूत सोयी सुविधांसाठी आजही झगडावे लागते. त्यामुळे प्रभागात चांगल्या प्रकारे मुलभूत सोयी सुविधा पुरविणे आणि विविध सार्वजनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin