Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ६३ - कासारवाडी प्रभागात चार वर्षांत भरीव कामांचा अभाव


Main News

>> प्रभागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात नगरसेवकांना अपयश
>> आरक्षणे ताब्यात असूनही त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ६३, कासारवाडीमध्ये १९९७ नंतर कोणताच विकास झालेला नाही. प्रभागात पूर्वीपासून पाण्याचा प्रश्न असून, तो सोडविण्यासाठी दहा वर्षांपूर्वी पाण्याची टाकी बांधण्यात आली. तरीही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. प्रभागातील बहुतांश आरक्षणांचा ताबा महापालिकेकडे आहे. परंतु, त्यांच्या विकासासाठी नगरसेवकांकडून प्रयत्न झाले नाहीत. ज्या काही सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, त्या प्रभागाच्या एका टोकाला आहेत. त्यामुळे नागरिकांना त्यांचा वापर करता येत नाही. गेल्या चार वर्षांचा विचार केल्यास प्रभागात भरीव कामेच झालेली नाहीत, असे या प्रभागातील इच्छुकांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किरण मोटे आणि शिवसेनेच्या नगरसेविका आशा शेंडगे हे प्रभाग क्रमांक ६३, कासारवाडीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या प्रभागातून कुणाल लांडगे, भागवत जवळकर आणि आदम पटेल हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. प्रभागात पूर्वीपासून कमी दाबाने पाणी येते. हा प्रश्न सोडविण्यासाठी दहा वर्षांपूर्वी प्रभागात पाण्याची टाकी बांधण्यात आली. परंतु, तिचा वापर होत नसल्याने पडून आहे. प्रभागात पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली तेव्हा ७ ते ८ हजार लोकसंख्या होती. आज दहापट लोकसंख्या वाढली असली तरी त्याच पाइपलाइनमार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. काही भागात नवीन पाइपलाइन टाकण्यात आली असली तरी पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. प्रभागाच्या काही भागात तर पाणीच येत नाही. हिराबाई लांडगे झोपडपट्टी, गुलिस्तान, पोखलावस्ती आणि पार्श्वनाथ सोसायटी या भागात पाण्याचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो, असे इच्छुकांनी सांगितले.

प्रभागात भूमीगत सांडपाणी व्यवस्था आहे. सांडपाणी व्यवस्था तुंबण्याचे प्रकार अनेकदा घडतात. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर येते. त्याची दोन-दोन दिवस साफसफाई होत नाही. सांडपाणी व्यवस्थेची क्षमता वाढविण्यासाठी गेल्या चार वर्षांत कोणतीच कामे झालेली नाहीत. प्रभागातील सांडपाणी मैलाशुद्धीकरण प्रकल्पाला जोडण्यात आले आहे. परंतु, काही सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे नदीपात्र प्रदूषित झाले आहे. प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी रोज घंटागाड्या येतात. त्यामुळे कचऱ्याचा फार मोठा प्रश्न उद्भवत नाही. प्रभागाच्या ८० टक्के भागात भूमीगत विद्युत व्यवस्था आहे. उर्वरित भाग चाळ्यांचा परिसर असल्यामुळे तेथे विद्युत व्यवस्था भूमीगत करता आलेली नाही. प्रभागाच्या सर्व भागात विद्युत खांब बसविण्यात आले आहेत. या खांबांना एलईडी दिवे लावण्याचे काम सुरू असल्याचे इच्छुकांनी सांगितले.

प्रभागातील मुख्य रस्ता वगळल्यास अन्य एकाही रस्त्याचे विकास आराखड्यानुसार रूंदीकरण झालेले नाही. आहे त्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. एकदा डांबरीकरण झाले की दर सहा महिन्यांनी केबल टाकण्याच्या नावाखाली रस्ते खोदले जातात. प्रभागातील ८० टक्के रस्त्यांचे चार वर्षांत डांबरीकरण झालेले नाही. जी कामे झाली ती केवळ टक्केवारीसाठी करण्यात आली आहेत. रस्त्यांच्याकडेला आजही राडारोडा पडलेला आहे. रस्ते वारंवार खोदले जात असल्यामुळे त्यांची साफसफाई होत नाही. प्रभागाच्या प्रत्येक रस्त्यांवर मानकापेक्षा अधिक उंचीचे गतिरोधक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर अपघात हे नित्याचेच झाले आहेत. गतिरोधकांमुळे एका लहान मुलाचा जीवही गेला आहे. पावसाळ्यात गतिरोधक पाणी अडविण्याचे काम करतात. त्यामुळे बहुतांश रस्ते पाण्याखाली गेलेले असतात, असे इच्छुकांनी सांगितले.

प्रभागात विविध सार्वजनिक प्रयोजनासाठी १५ पेक्षा अधिक आरक्षणे आहेत. त्यापैकी दोन उद्यान, एक शाळा, स्मशानभूमी, भाजी मंडईच्या जागेत शासकीय कार्यालयासाठी इमारत उभारण्यात आली आहे. उर्वरित आरक्षणांचा महापालिकेकडे ताबा असूनही त्यांचा विकास करण्यासाठी नगरसेवकांनी पाठपुरावा केलेला नाही. एक उद्यान प्रभागाच्या एका टोकाला बांधण्यात आले आहे. थोडासा अंधार पडला तर तिकडे कोणीही फिरकत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे या उद्यानाचा दारुड्यांना फायदा झाला आहे. कै. मामासाहेब पिंपळे हे प्रभागातील दुसरे उद्यान शेवटच्या घटका मोजत आहे. या उद्यानाकडे जाण्यासाठी रस्ता नसतानाही ते उभारण्यात आले आहे. भाजी मंडईसाठी आरक्षित जागेत उभारलेली इमारत दुय्यम निबंधक, विभागीय करसंकलन कार्यालय व इतर कारणांसाठी भाड्याने देण्यात आले आहे. त्यामुळे भाजी विक्रेते रस्त्यावर व्यवसाय करत आहेत. प्रभागात दफनभूमीची परिस्थिती चांगली आहे. परंतु, ती आता अपुरी पडत आहे. स्मशानभूमीची अवस्था चांगली आहे. परंतु, तेथे कपडे बदलण्यासाठी एक खोली व पाण्याची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे इच्छुक म्हणाले.

प्रभागातील ऊर्दू माध्यमाची शाळा आजही पत्र्याच्या खोलीत भरते. विद्यार्थ्यांना तेथे बसताही येत नाही. प्रभागात एक शाळा असताना केशवनगर परिसरात दोन एकर जागेत माध्यमिक शाळेसाठी आणखी एक आरक्षण होते. या शाळेची आवश्यकता नसल्यामुळे नगरसेविका आशा शेंडगे यांनी शाळेचे आरक्षण रद्द करून तेथे मैदान करण्याचे काम केले. त्यासाठी त्यांनी आयुक्तांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे प्रभागात खेळण्यासाठी मैदान उपलब्ध झाले. प्रभागात एखादे सांस्कृतिक भवन होण्याची आवश्यकता आहे. शास्त्रीनगरमधील भाजी मंडईसाठीचे आरक्षण रद्द करून तेथे महापालिकेने तेथे इमारत बांधली आहे. ती नगरसेवकाने भाड्याने दिली आहे. काही तरूण गटागटाने गाड्या फिरवून प्रभागात दहशत माजविण्याचा प्रयत्न करतात. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस नसतात. पोलिस चौकी प्रभागाबाहेर असून, ती प्रभागात उभारण्याची गरज आहे. नगरसेविका आशा शेंडगे या महापालिकेच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करतात. प्रभागातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्याची गरज असल्याचे इच्छुकांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin