Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ६३ - मिशन २०१७ ; कासारवाडी प्रभागातील असे आहेत इच्छूक


Main News

पिंपरी, दि. १ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६३ असलेल्या कासारवाडी प्रभागातून भागवत जवळकर, आदम पटेल, कुणाल लांडगे या इच्छुकांनी 'पीसीबी'च्या 'मिशन २०१७ ; चर्चा तर होणारच' या उपक्रमात सहभाग घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल... 

भागवत काळुराम जवळकर 
जवळकर भाजपचे काम करतात. त्यांचा बांधकाम व्यावसाय आहे. त्यांचे वय ३१ असून त्यांनी कलाशाखेच्या प्रथम वर्षापर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांचे दिवंगत चुलते भीमराव जवळकर १९९२ ला अपक्ष नगरसेवक होते. त्यांचा राजकीय वारसा त्यांना पुढे चालवायचा आहे. ते प्रथमच महापालिका निवडणुकीस इच्छूक आहेत.  भागवत जवळकर संघर्ष युवा प्रतिष्ठाण, जय हिंद तरुण मंडळाचे अध्यक्ष आहेत. मंडळाच्या माध्यमातून ते सांस्कृतिक महोत्सव, व्याख्याने, प्रवचने असे विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबवितात. प्रभागातील वाहनतळ विकसीत करणे, देशासाठी बलिदान देणाऱ्या थोर पुरुषांची स्मारके प्रभागात बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना मोफत आरोग्य विमा काढून देणार आहे. संपूर्ण प्रभागात वाय-फाय सुविधा देण्याचा त्यांचा मानस आहे. 

आदम मकतुम पटेल 
आदम पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग अध्यक्ष आहेत. त्यांचे वय ४५ असून त्यांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांचे गॅरेज आहे.  पटेल हे प्रथमच महापालिका निवडणुकीस इच्छूक आहेत. एटीआय स्पोर्टस क्लबचे ते अध्यक्ष आहेत. वीज, पाणी, अंतर्गत रस्ते या मूलभूत सुविधा सक्षपणे सर्व घटकातील नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी ''पीसीबी''शी बोलताना सांगितले. 

कुणाल दशरथ लांडगे 
३२ वर्षीय कुणाल लांडगे दहावी उत्तीर्ण आहेत. त्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे दिवंगत वडील दशरथ लांडगे १९९२ ला काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यांची अपूर्ण राहिलेली विकास कामे त्यांना पूर्ण करायची आहेत. लांडगे प्रथमच महापालिका निवडणुकीस इच्छूक आहेत. नवमहाराष्ट्र तरुण मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. मंडळाच्या माध्यमातून ते प्रभागात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवितात. प्रभागात मैदान, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, उद्यान त्याचबरोबर कासारवाडी गावाबाहेर असलेली पोलीस चौकी गावात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
गणेश बाबुराव संभेराव 
गणेश संभेराव हे ३७ वर्षांचे असून, ते वाणिज्य शाखेचे पदव्युत्तर पदवीधर आहे. पवना सागर स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष व भैरवनाथ उत्सव कमिटीचे सचिव म्हणून ते काम पाहत आहेत. कासारवाडी प्रभागाच्या नियोजनबद्ध विकास करणे, सर्वसामान्यांपर्यंत सरकारी योजना पोचविणे, बेरोजगार तरूणांना रोजगार पोचविणे, महापालिकेमार्पत दिल्या जाणाऱ्या सर्व सोयीसुविधा सक्षम करण्यासाठी आपणाला नगरसेवक व्हायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin