Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ६२ - मिशन २०१७ ; फुगेवाडी प्रभागातून हे आहेत इच्छूक


Main News

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६२ असलेल्या फुगेवाडीतून संभाजी फुगे, प्रा. मनोज वाखेरे, निलेश हाके आणि वैशाली वाखारे यांनी 'पीसीबी'च्या 'मिशन २०१७ ; चर्चा तर होणारच' या उपक्रमात सहभाग घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल...

संभाजी आनंदा फुगे
२९ वर्षीय संभाजी फुगे यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचा फायनान्सचा व्यवसाय आहे. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे ते शहर उपाध्यक्ष आहेत. २०१२ ची महापालिका निवडणूक त्यांनी भाजपकडून लढविली होती. तेव्हा आलेले अपयश भरुन काढण्यासाठी ते आता तयारीला लागले आहेत. हिंदवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, श्रीगणेश तरुण मंडळाचे कार्याध्यक्ष व खासदार अमर साबळे यांच्यासमवेत 'कोअर टीम'मध्ये महसूल विभागासाठी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. स्थानिकांना प्रभागातील कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देणे, अंतर्गत रस्ते विकसित करणे, प्रभाग स्वच्छ व सुंदर करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. 

प्रा. मनोज शिवाजी वाखारे 
मनोज वाखारे हे पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निकमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वय ३२ असून त्यांनी एमए एमफील केले आहे. आझाद हिंद मंडळाचे सचिव, एकता युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे सदस्य म्हणून ते काम पाहतात. त्यांच्या चुलती उषा वाखारे व दिवंगत चुलते अप्पासाहेब वाखारे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवकपद भुषविलेले आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रथम इच्छूक असल्याचे सांगत प्रभागातील खोळंबलेली विकास कामे मार्गी लावणे, मुबलक पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी, प्रशस्त रस्ते विकसित करणे तसेच शासनाच्या व महापालिकेच्या योजना तळागाळात पोहचविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.   

निलेश एकनाथ हाके 
२७ वर्षीय निलेश हाके यांनी कॉम्प्युटर डिप्लोमा केला आहे. ते लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून ते काम पाहतात. मागील महापालिका निवडणुकीत ते इच्छूक होते. मात्र, युतीच्या जागा वाटपामध्ये हा प्रभाग भाजपच्या वाट्याला गेल्याने त्यांनी थांबणे पसंत केले. शिवशक्ती तरुण मंडळ व उमेश चांदगुडे युवा मंचचे ते अध्यक्ष आहेत. स्थानिकांना रोजगार मिळवून देणे, ज्येष्ठांसाठी सुसज्ज विरंगुळा केंद्राची उभारणी, प्रभागातील आरक्षणांचा विकास करायचा असल्याचे हाके यांनी सांगितले. 

वैशाली धनंजय वाखारे 
वैशाली वाखारे या गृहिणी असून त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या सदस्य म्हणून त्या राजकारणात सक्रिय आहेत. सद्गुरू महिला बचत गटाच्या त्या अध्यक्षा आहेत. तसेच आझाद हिंद मंडळाच्या सदस्य म्हणूनही त्या काम करत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी त्या प्रथमच इच्छुक आहेत. त्यांचे सासरे हनुमंत ऊर्फ अण्णासाहेब वाखारे १९८३ मध्ये काँग्रेसचे नगरसेवक होते. तसेच त्यांच्या चुलत सासू उषा यशवंत वाखारे या १९९२ मध्ये काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. त्यांना प्रभागातील मुलभूत सोयी सुविधा सक्षम करायच्या आहेत. प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे रूंदीकरण करायचे आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील भुयारी मार्ग चांगले बनवायचे आहे. तसेच प्रभागातील तरूण व तरूणींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेविका व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin