Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ६१ - मिशन २०१७; हुतात्मा भगतसिंग विद्यालय प्रभागातून हे आहेत इच्छूक


Main News

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६१, हुतात्मा भगतसिंग विद्यालयातून शेखर काटे हे इच्छुक आहेत. त्यांनी “पीसीबी टुडे”च्या “मिशन २०१७ ; चर्चा तर होणारच”या उपक्रमात सहभाग घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल...
 
शेखर चंद्रकांत काटे 
शेखर काटे हे ३० वर्षांचे असून त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटमधील पदवी प्राप्त केली आहे. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी यापूर्वी एनएसयुआयचे पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीसपदावर काम केले आहे. शेखर काटे युवा मंचचे ते संस्थापक आहेत. त्यांच्या मातोश्री स्वाती चंद्रकांत काटे या २००२ मध्ये अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. तसेच दापोडीचा परिसर पुणे महापालिकेत समाविष्ट असताना त्यांचे वडिल चंद्रकांत काटे हे २००५ मध्ये काँग्रेसचे नगरसेवक होते. प्रभागात खेळाचे मैदान, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे, नागरिकांना चांगली आरोग्य सेवा पुरविणे, महिला बचत गटांचे सक्षमीकरण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि प्रभागातील मुलभूत सोयी सुविधा सक्षम करण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin