Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ६१ - जागाच उपलब्ध नसल्याने हुतात्मा भगतसिंग विद्यालय प्रभागात मोठा प्रकल्प नाही


Main News

>> प्रभागातील एकाही आरक्षणांचा ताबा अद्याप घेतलेला नाही
>> प्रभागातील मुलभूत सोयी सुविधा आणखी सक्षम करण्याची आवश्यकता

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ६१, हुतात्मा भगतसिंग विद्यालयमध्ये विकास करण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेल्या नाहीत. काही आरक्षणे असूनही त्याचा ताबा महापालिकेने घेतलेला नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षांत प्रभागात कोणताही मोठा प्रकल्प झालेला नाही. प्रभागाचा काही परिसर पूर्वी पुणे महापालिकेत समाविष्ट होता. त्यावेळी या भागाला मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. त्यावरच आजही काम चालते. त्या अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे या प्रभागातील इच्छुकांनी सांगितले.   
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रोहित काटे आणि राष्ट्रवादीच्याच नगरसेविका रमा ओव्हाळ हे प्रभाग क्रमांक ६१, हुतात्मा भगतसिंग विद्यालय प्रभागाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या प्रभागातून शेखर काटे हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. प्रभागात एकवेळ पाणीपुरवठा होतो. पिण्याच्या पाण्याच्या प्रभागात दोन टाक्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळते. गेल्या चार वर्षांत प्रभागाच्या काही भागात पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाइन टाकण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
 
संपूर्ण प्रभागात भूमीगत सांडपाणी व्यवस्था आहे. प्रभागातील ४० टक्के परिसर झोपडपट्टीचा भाग आहे. या भागातही सांडपाणी व्यवस्था आहे. सांडपाणी व्यवस्थेची नियमित साफसफाई होत नाही. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरच साफसफाई केली जाते. प्रभागात दररोज तयार होणारे सांडपाणी मैलाशुद्धीकरण केंद्राला जोडण्यात आलेले नाही. बहुतांश सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत सांडपाण्याची कोणतीही नवीन कामे झालेली नाहीत. प्रभागात पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाळी पाणी सांडपाणी व्यवस्थेतूनच वाहते, असे ते म्हणाले.
 
प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या वेळेवर येत नाहीत. प्रभागातील अनेक भागात कचराकुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या भरून वाहत असतात. तेथे नियमित साफसफाई केली जात नाही. कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या न आल्यास नागरिक मोकळी जागा दिसेल तेथे कचरा टाकतात. संपूर्ण प्रभागात भूमीगत विद्युत व्यवस्था आहे. प्रभागात सगळीकडे विद्युत खांब उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रभागातील विद्युत व्यवस्था चांगली आहे. आता एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू आहे. प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचा विकास आराखड्यानुसार रुंदीकरण झालेले नाही. आता तेथे घरे झालेली असल्याने रस्त्यांचे रूंदीकरण करणे अवघड बनले असल्याचे ते म्हणाले.
 
अंतर्गत रस्ते अरूंद असल्यामुळे एकावेळी दोन गाड्या जाऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. महात्मा फुले वसाहत याठिकाणच्या रस्त्याच्या रूंदीकरण रखडले आहे. तेथील झोपडीधारकांचे पुनर्वसन करून रस्ता रुंद करणे आवश्यक आहे. प्रभागातील रस्त्यांची नियमित साफसफाई होते. शिवाजी पुतळा आणि आंबेडकर पुतळा चौकात वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या चौकात सिग्नल असूनही ते अनेकदा बंद अवस्थेतच असतात. चौकांमध्ये वाहतूक पोलिस थांबत असले तरी हा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे या दोन्ही चौकातील वाहतूकोंडीवर कायमची उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
 
प्रभागात रेल्वेच्या हद्दीत झोपड्या वसलेल्या आहेत. या झोपड्यांसह प्रभागातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होण्याची गरज आहे. प्रभागात कोणताही मोठा प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. दापोडीचा भाग पुणे महापालिकेत समाविष्ट असताना येथे एक दवाखाना उभारण्यात आला होता. तो खूप कमी जागेत आहे. तेथे सोयी सुविधाही कमी आहेत. त्यामुळे दवाखान्याचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे. प्रभागात अनेक आरक्षणे आहेत. परंतु, त्यातील काही आरक्षणांचा विषय न्यायालयात आहे, तर काही आरक्षणांचा महापालिकेने ताबा घेतलेला नाही. त्यामुळे प्रभागात कोणताच मोठा प्रकल्प उभा राहिलेला नाही. महापालिकेच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी नगरसेवक प्रयत्न करतात, असे त्यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin