Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ६० - सांगवी गावठाण प्रभाग “मॉडेल”ऐवजी बनला “तोडेल वॉर्ड”


Main News

>> मॉडेल वॉर्ड करण्यासाठी झालेला खर्च गेला वाया
>> प्रभागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण 

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ६०, सांगवी गावठाण “मॉडेल वॉर्ड” करण्यासाठी मागील पंचवार्षिकपासून कामे केली जात आहेत. प्रत्यक्षात गेल्या नऊ वर्षांत हा प्रभाग “मॉडेल वॉर्ड”ऐवजी “तोडेल वॉर्ड” तयार झाला आहे. प्रभागातील बहुतांश रस्ते गेल्या दोन महिन्यांपासून खोदून ठेवलेले आहेत. त्यामुळे अपघातही झाले आहेत. प्रभागातील आरक्षणांच्या जागा ताब्यात घेण्यावर खर्च करण्याऐवजी त्याच त्या कामांवर कोट्यवधी रुपयांचा नाहक खर्च केला जात आहे. गेल्या चार वर्षांत प्रभागामध्ये उद्यान आणि आतमध्ये शिवसृष्टी उभारण्यापलीकडे कोणतेही भरीव काम झाले नसल्याचे या प्रभागातील इच्छुकांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे आणि राष्ट्रवादीच्याच नगरसेविका सोनाली जम हे प्रभाग क्रमांक ६०, सांगवी गावठाणचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या प्रभागातून उज्ज्वला ढोरे, राजेंद्र काटे, राजू सावळे, चेतन शिंदे आणि विजय साने हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. प्रभागात कमी दाबाने पाणी येते. गेल्या चार वर्षांत प्रभागाच्या काही भागात पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाइन टाकण्यात आली आहे. प्रभागात लहान मोठ्या १०० हून अधिक गृह सोसायट्या आहेत. यातील बहुतांश सोसायट्यांना स्वखर्चाने टँकरने पाणी मागवावे लागते. प्रभागात पाण्याची बाराही महिने हीच परिस्थिती असते. तरीही २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले जात आहे. संपूर्ण प्रभागात भूमीगत सांडपाणी व्यवस्था आहे. परंतु, जमिनीवर सिमेंटचे प्लॅस्टर न करता ती बांधण्यात आली आहे. निकृष्ट दर्जाच्या या कामांमुळे सांडपाणी व्यवस्थेला घुशींनी पोखरले आहे. पिण्याच्या पाण्याची आणि सांडपाण्याची पाइपलाइन एकत्रितच टाकण्यात आली आहे. त्यामुळे काही भागाला नेहमीच दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे इच्छुकांनी सांगितले.

केवळ मुख्य रस्त्यांच्याकडेने पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित ठिकाणी सांडपाणी व्यवस्थेला जोडण्यात आलेले आहे. प्रभागातील कचरा उचलण्यासाठी चार-चार दिवस घंटागाड्या येत नाहीत. अनेक घंटागाड्या नादुरूस्त आहेत म्हणून सांगितले जाते. कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्याने कचरा गोळा करण्यास टाळाटाळ होते. त्यामुळे प्रभागातील कचराकुंड्या भरून वाहतात. नागरिक मोकळ्या जागा दिसल्या की तेथे कचरा टाकतात. दशक्रिया घाटाजवळील कचरा संकलन केंद्रात कचऱ्याला आग लावण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. कचरा उचलण्याच्या कामाचे कोणतेही नियोजन नाही. प्रभागात भूमीगत विद्युत व्यवस्था आहे. प्रभागाच्या बहुतांश भागात विद्युत खांब बसविण्यात आले आहेत, असे इच्छुकांनी सांगितले.

खोदकामामुळे प्रभागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी गेल्या दोन महिन्यांपासून रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरून चालताही येत नाही. वाहनांना अनेकदा अपघातही झाले आहेत. प्रभागातील मुख्य रस्त्यांचे काही भागात अजूनही रूंदीकरण झालेले नाही. सरळ जाणारे रस्ते सोयीसाठी नागमोडी करण्यात आली आहेत. अंतर्गत रस्ते अरूंद आहेत. रस्त्यांची साफसफाई केली जात नाही. भाजी मंडईतील गाळे व्यवसाय न करणाऱ्यांना दिल्यामुळे खरे भाजी विकणारे रस्त्यांवर हातगाड्या उभ्या करून व्यवसाय करत आहेत. बहुतांश रस्त्यांवर हातगाडीधारकांनी अतिक्रमण केलेले आहे. फूटपाथवरून नागरिक जाऊच शकत नाही, अशी परिस्थिती आहे. प्रभागात पार्किंग शिल्लकच राहिलेले नाही. सर्व गाड्या रस्त्यावरच लावल्या जातात, असे इच्छुक म्हणाले.

प्रभागात विविध सार्वजनिक प्रयोजनासाठी अनेक आरक्षणे आहेत. परंतु, त्यातील उद्यानाचे आरक्षण विकसित करण्यात आले आहे. तेथे शिवसृष्टी साकारण्यात आली आहे. त्याचा नागरिकांना चांगला उपभोग घेता येतो. परंतु, उर्वरित आरक्षणे विकसित करण्याबाबत काहीच कार्यवाही होत नाही. चार एकर जागेवर मैदानाचे आरक्षण आहे. ही जागा मोकळी आहे. त्यावर अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून जागेला सीमाभींत बांधण्याचेही काम केले जात नाही. उर्वरित आरक्षणांच्या जागाही मोकळ्या आहेत. परंतु, त्यांचा ताबा घेण्यासाठी खर्च केला जात नाही. परंतु, नको त्या कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून जनतेचे पैसै नाहक उधळले जात आहेत. प्रभागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याकडे नगरसेवक लक्ष देत नाहीत, असे इच्छुक म्हणाले.

प्रभाग “मॉडेल वॉर्ड” करण्यासाठी गेल्या पंचवार्षिकपासून कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत फूटपाथ तयार करणे, केबल टाकणे आणि रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम झाले आहे. परंतु, पुन्हा रस्ते खोदल्यामुळे प्रभाग “मॉडेल वॉर्ड”ऐवजी “तोडेल वॉर्ड” बनले आहे. प्रभागाचे दोन्ही नगरसेवक गेली चार वर्षे प्रभागात फिरकलेच नाहीत. नगरसेविका तर प्रभागातील नागरिकांना दिसतच नाहीत. महापालिकेच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी नगरसेवक स्वतःहून कोणतेही प्रयत्न करत नाहीत. काही जवळच्या नागरिकांना योजनांचा लाभ पोचविला जातो. त्यामुळे काही नागरिक स्वतःहून योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज केल्यास त्यांना नगरसेवकांच्या सांगण्यानुसार अपात्र ठरविले जाते. प्रभाग नदीच्याकडेने असल्यामुळे मैलाशुद्धीकरण प्रकल्पाला पुरापासून वाचविण्यासाठी तब्बल ९ कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, त्याच्या शेजारी असलेल्या झोपडपट्टीला वाचविण्यासाठी एक रुपयाही खर्च केला गेला नाही. मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे प्रभागातील नागरिक डासाने हैराण झाले आहेत, असे इच्छुकांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin