Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ६० - मिशन २०१७ ; सांगवी गावठाण प्रभागातून हे आहेत इच्छूक


Main News

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६० असलेल्या सांगवी गावठाण प्रभागातून उर्मिला ढोरे, राजेंद्र काटे, विजय साने, चेतन शिंदे, राजू सावळे यांनी “पीसीबी टुडे”च्या “मिशन २०१७ ; चर्चा तर होणारच” या उपक्रमात सहभाग घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल...

उज्ज्वला सुनील ढोरे 
उज्ज्वला ढोरे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या विभागप्रमुख आहेत. त्यांचे वय ३८ असून त्या दहावी उत्तीर्ण आहेत. ओंकारेश्वर महासंघ, सिध्देश्वर महिला मंडळाच्या त्या संस्थापक अध्यक्षा आहेत. ढोरे यांचे ४२ बचतगट असून गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे जाळे निर्माण केले आहे. २००७ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्या दोन नंबर क्रमांकावर होत्या. आता पुन्हा त्या जोमाने तयारीला लागल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ढोरे प्रभागातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणासाठी मदत करत आहेत. नदीचे सुधारीकरण, वीज, पाणी, अंतर्गत रस्ते या मूलभूत सुविधांबरोबरच स्मशानभूमीत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

राजेंद्र मारुती काटे 
४२ वर्षीय काटे यांचा फुलाचा व्यवसाय आहे. त्यांनी एस. वाय. बीए पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. काटे स्थानिक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत. काटे यांनी आजवर मावळ लोकसभा, चिंचवड विधानसभा आणि महापालिकेची तीन वेळा अपक्ष निवडणूक लढवली आहे. वीज, पाणी, अंतर्गत रस्ते या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

विजय माधवराव साने 
विजय साने शिवसेनेचे सांगवी विभागप्रमुख आहेत. त्यांचे वय ४७ असून त्यांनी बीकॉम पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ढोरेनगर मित्र मंडळ, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणचे ते उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर केंद्रीय दुरसंचार मंत्रालय सल्लागारपदीही साने कार्यरत आहेत. मंडळाच्या माध्यमातून ते प्रभागात विविध उपक्रम राबवितात. वीज, पाणी, अंतर्गत रस्ते या मूलभूत सुविधा सक्षमपणे सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

चेतन कैलास शिंदे 
चेतन शिंदे हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे वय ३८ असून ते दहावी उत्तीर्ण आहेत. त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. शिंदे यांनी २०१२ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर महापालिका निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर होते. अभिनव तरुण मित्र मंडळ, संयुक्त जाणता राजा प्रतिष्ठाणचे ते अध्यक्ष आहेत. प्रतिष्ठाणच्या माध्यमातून प्रभागात समाजोपयोगी उपक्रम राबवितात. प्रभागात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पाणी, वीज याबरोबरच आरक्षणे ताब्यात घेवून विकसित करण्याचा त्यांचा मनोदय आहे. 

राजू दत्तू सावळे 
राजू सावळे मनसेचे शहर सचिव व पिंपरी-चिंचवड पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचे वय ४९ असून ते दहावी उत्तीर्ण आहेत. सावळे यांनी २००७ मध्ये सामन्य जनतेची आघाडीकडून तर २०१२ मध्ये मनसेकडून महापालिका निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर होते. पवना, मुळा नदी शुध्द राहण्यासाठी तसेच आरोग्याच्या दर्जेदार सुविधा सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभागातील आरक्षणे ताब्यात घेवून विकसित करण्याचा त्यांचा मनोदय आहे

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin