Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ५९- मिशन २०१७ ; मधुबन प्रभागातील असे आहेत इच्छूक


Main News

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५९  असलेल्या मधुबन प्रभागातून हिरेन सोनवणे, संतोष ढोरे, महेश भागवत  या इच्छुकांनी 'पीसीबी'च्या 'मिशन २०१७ ; चर्चा तर होणारच' या उपक्रमात सहभाग घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल...

हिरेन अशोक सोनवणे 
हिरेन सोनवणे भाजपचे माजी नगरसेवक अशोक सोनवणे यांचे चिरंजीव आहेत. त्यांचा बांधकाम व्यवसाय असून त्यांचे वय ४० आहे. त्यांनी बीकॉमपर्यंत शिक्षण घेतले आहे. ते प्रथमच महापालिका निवडणुकीस इच्छूक आहेत. सोनवणे भाजयुमोचे शहर उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम वर्ष शिक्षित आहेत. तसेच स्वामी विवेकानंद प्रतिष्ठाणचे सदस्य आहेत. प्रतिष्ठाणच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांचा सत्कार असे विविध सामाजिक उपक्रम राबवितात. नदी पात्रातील जलपर्णी, प्रभागात भाजी मंडई बांधण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. ''फलक'' मुक्त प्रभाग करण्याचा त्यांचा मानस आहे. 

संतोष नानासाहेब ढोरे 
संतोष ढोरे पुणे विद्यापिठाचे सिनेट सदस्य आहेत. त्यांचे वय ३८ असून त्यांनी एमए एमफील पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे उपहारगृह आहे. ते मधुबन मित्र मंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष पदावर काम केले आहे. ढोरे यांनी २०१२ मध्ये अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. परंतु, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सांगण्यावरुन त्यांनी माघार घेतली होती. सिनेट सदस्य पदाच्या माध्यमातून ढोरे यांनी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. तसेच विविध महाविद्यालयात व्यक्तीमत्व विकास, स्पर्धा परिक्षा केंद्र सुरु केले आहेत. ढोरे गेली २० वर्षापासून प्रभागातील समस्यांचे निराकरण करत आहेत. त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला असून प्रभागात सांस्कृतिक भवन, भाजी मंडई, दवाखाना बांधण्याचा त्यांचा मनोदय आहे. 

महेश हरिश्चंद्र भागवत 
५३ वर्षीय भागवत हे दहावी उत्तीर्ण आहेत. त्यांचा किराणा मालाचा व्यवसाय आहे. त्यांच्या पत्नी निलिमा भागवत यांनी २०१२ मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या. महेश भागवत यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शहरउपाध्यक्ष पदावर काम केले आहे. ते सांगवी विकास मंचाचे संस्थापक आहेत. मंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, व्याख्यानमाला, रोजगार मेळावा, आरोग्य शिबिर असे विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम प्रभागात राबवितात. वीज, पाणी, अंतर्गत रस्ते या मूलभूत सुविधा सक्षमपणे सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी ''पीसीबी''शी बोलताना सांगितले. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin