Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ५८- मिशन २०१७ ; नवी सांगवी प्रभागातून हे आहेत इच्छूक


Main News

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवी सांगवी (क्रमांक ५८) प्रभागातून विनायक गारवे, संदीप दरेकर, गौरव टण्णू, श्रीनिवास बढे, शशिकांत राजेगावकर, ललित म्हसेकर, दिपक ढोरे आणि अमित निंबाळकर यांनी "पीसीबी"च्या "मिशन २०१७ ; चर्चा तर होणारच" या उपक्रमात सहभाग घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलची माहिती...


विनायक किशोर गारवे - विनायक गारवे हे माजी नगरसेविका सावित्री गारवे यांचे चिरंजिव आहेत. त्यांचे वय ३२ वर्षे असून ते सिव्हिल इंजिनिअर आहेत.  ते बांधकाम व वाहतूक व्यावसायिक आहेत. महाराष्ट्र मित्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. मूलभूत सोई-सुविधांची पूर्तता, बेरोजगार युवकांसाठी रोजगार केंद्र उभारणीसाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

संदीप दादाभाऊ दरेकर - २९ वर्षीय संदीप दरेकर हे वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. त्यांचा स्वतःचा व्यवसाय असून श्री साई ट्रस्टचे कार्याध्यक्ष, सुवर्णयुग मित्र मंडळाचे खजिनदार म्हणून ते कार्यरत आहेत. अण्णा हजारे यांना सामाजिक तर आमदार लक्ष्मण जगताप यांना ते राजकीय क्षेत्रातील गुरु मानतात. मूलभूत सोई-सुविधांबरोबरच, सिमेंट क्राँक्रीटचे रस्ते, मुबलक पाणीपुरवठ्याला प्राधान्य देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. 

गौरव सुर्यकांत टण्णू - गौरव टण्णू हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आहेत. त्यांचे वय २५ असून त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट केले आहे. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. महापालिकेच्या २००२ च्या निवडणुकीत त्यांचे वडील सुर्यकांत टण्णू हे विद्यमान आमदार व तत्कालीन महापौर लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकीटावर लढले होते. तेव्हा त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते होती. मूलभूत सोई-सुविधांबरोबरच कृष्णा चौकातील वाहतुकीचा प्रश्न सोडविणे तसेच आजी-माजी नगरसेवकांना जे जमले नाही ते काम करायचे असल्याचे गौरव यांनी सांगितले. 

शशिकांत गुलाब राजेगावकर - राजेगावकर हे मनसेचे शहर उपाध्यक्ष आहेत. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यांचे वय ४० असून त्यांनी मेकॅनिकल डिप्लोमा केला आहे. २००७ मध्ये अपक्ष तर २०१२ ची महापालिका निवडणूक त्यांनी मनसेच्या तिकीटावर लढविली होती. तेव्हाचे अपयश यावेळी भरुन काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यमान नगरसेवकांनी निवडणुकीपूर्वी जाहिर केलेल्या जाहिरनाम्यानुसार कामे केली नाहीत. आपण जाहिरनामा प्रत्यक्षात उतरवू, असे त्यांनी सांगितले. 

श्रीनिवास आसाराम बढे - श्रीनिवास बढे हे गेली २० वर्षे भाजपचे काम करतात. त्यांचे वय ४५ असून त्यांनी आयटीआय केला आहे. फोर्स मोटर्स कंपनीत ते नोकरी करतात. तेथील कामगार संघटनेचे ते माजी सरचिटणीस आहेत. भाजपचे शहर उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. मागील महापालिका निवडणुकीसाठी ते इच्छूक होते. मात्र, वॉर्ड युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नाही. आता ते पुन्हा तयारीला लागले आहेत. मुबलक पाणीपुरवठा, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, मुलांसाठी क्रीडांगण उभारण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. 

ललित जालिंदर म्हसेकर - २७ वर्षीय ललित म्हसेकर हे आमदार लक्ष्मण जगताप यांना आदर्श मानतात. त्यांनी मेकॅनिकल बीटेक पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच दगडूशेठ ट्रस्टच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ते परिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणे तसेच महिलांसाठी रोजगार उपलब्ध करुन द्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले. 

दिपक ढोरे - ४८ वर्षीय दिपक ढोरे यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. शिवसेनेचे ते चिंचवड विधानसभा उपशहरप्रमुख आहेत. त्यांच्या भावजयी शोभा ढोरे यांनी २००२ ची महापालिका निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती. यावेळी दिपक ढोरे स्वतः इच्छूक आहेत. गेली दहा वर्षात प्रभागात कोणतीच कामे झाली नाहीत. ती करायची असल्याचे त्यांनी सांगितले.

अमित अरुण निंबाळकर - अमित निंबाळकर यांचे वय ४० असून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. शिवसेनेचे ते उपविभागप्रमुख आहेत. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यांच्या पत्नी पूर्वा यांनी महापालिकेची २०१२ ची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. वॉर्डाचा विकास करण्यासाठी यावेळी आपण स्वतः इच्छूक असल्याचे त्यांनी सांगितले. 

राजेंद्र उत्तम पाटील - राजेंद्र पाटील हे ४२ वर्षांचे असून, त्यांचा बांधकाम व्यवसाय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपळेगुरव-सांगवी ब्लॉक अध्यक्षपद ते सांभाळत आहेत. स्वामी विवेकानंद सोसायटी मित्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत. याशिवाय नवी सांगवी विभागीय मित्र मंडळाचे सदस्य, खानदेश मित्र मंडळाचे सल्लागार म्हणूनही ते काम पाहत आहेत. प्रभाग कचराकुंडी मुक्त आणि मॉडेल वॉर्ड बनविण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना कायम उपलब्ध असणारा आणि त्यांच्या मुलभूत सोयी सुविधांविषयी असणाऱ्या समस्या तातडीने सोडविणारा नगरसेवक बनायचे आहे, असे ते म्हणाले.
 
भारती राजेंद्र पाटील - भारती पाटील या गृहिणी असून ३८ वर्षांच्या आहेत. त्यांनी २००७ मध्ये महापालिकेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्या दुसऱ्या क्रमांकावर होत्या. जाई-जुई-मोगरा बचत गटाच्या अध्यक्ष म्हणून त्या परिसरात सामाजिक काम करत आहेत. प्रभाग मॉडेल वॉर्ड बनविण्यासाठी आपणाला नगरसेविका व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभागात पर्यावरणासाठी अनेक कामे करायची आहेत. नागरिकांच्या कायम संपर्कात राहणाऱ्या नगरसेविका व्हायचे असल्याचे त्या म्हणाल्या.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin