Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ५७ - पिंपळेगुरव प्रभागात मुलभूत सोयीसुविधा, रस्ते व आरक्षणांचा विकास


Main News

>> आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रभागातील विकासकामांवर वैयक्तिक लक्ष
>> सर्व सुविधा मिळत असल्याने प्रभागातील नागरिक समाधानी

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ५७, पिंपळेगुरवमध्ये भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे वैय्यक्तिक लक्ष असल्यामुळे सर्व विकासकामे झाली आहेत. अपवाद वगळता सर्व आरक्षणांचा विकास झालेला आहे. प्रभागातील नागरिकांना सर्व सोयी-सुविधा मिळत आहेत. त्यामुळे प्रभागातील नागरिक समाधानी आहेत. प्रभागात कमी दाबाने पाणी येण्याची एकमेव समस्या भेडसावत आहे, असे या प्रभागातील इच्छुकांनी सांगितले.
 
महापौर शकुंतला धराडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजेंद्र जगताप हे प्रभाग क्रमांक ५७, पिंपळेगुरवचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या प्रभागातून नीलेश गांगार्डे, श्याम जगताप, शशिकांत कदम आणि योगेश जगताप हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप हे स्वतः पिंपळेगुरवमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांचे या प्रभागातील विकासकामांवर वैय्यक्तिक लक्ष असते. ते सकाळी वॉकिंगला जाण्यापासून ते विविध कामांसाठी प्रभागात स्वतः फिरत असतात. प्रत्येक कामांवर ते नजर ठेवून असतात. त्यामुळे प्रभागात कोणतीही कामे शिल्लक राहिलेली नाहीत. नागरिकांनाही सर्व सुविधा व्यवस्थित मिळत आहेत. त्यामुळे प्रभागातील नागरिकही समाधानी असल्याचे इच्छुकांनी सांगितले.
 
प्रभागात फक्त कमी दाबाने पाणी येण्याचा प्रश्न भेडसावत आहे. परंतु, शहराच्या सर्वच भागात ही परिस्थिती असल्यामुळे त्याला पिंपळेगुरव प्रभाग अपवाद ठरू शकत नाही. प्रभागात पिण्याच्या पाण्याची नवीन पाइपलाइन टाकण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्यास तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली जाते. प्रभागातील नागरिक पाण्यापासून वंचित राहू नये, याची नगरसेवक व कार्यकर्त्यांकडून पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचे इच्छुकांनी सांगितले.
 
प्रभागात भूमीगत सांडपाणी व्यवस्था आहे. प्रभागात दररोज तयार होणारे सांडपाणी मैलाशुद्धीकरण प्रकल्पाला जोडण्यात आले आहे. सांडपाणी व्यवस्था तुंबण्याचे प्रकार अनेकदा घडतात. परंतु, असे प्रकार घडल्यानंतर तातडीने साफसफाई केली जाते. त्यामुळे सांडपाणी तुंबल्यास फार मोठी समस्या निर्माण होत नाही. प्रभागात जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल, उद्यान, शाळा व मैदान विकसित करण्यात आले आहे. सध्या नाट्यगृह उभारण्याचे काम सुरू आहे. काटेपुरम चौकात रुग्णालयासाठी आरक्षित जागा आहे. तेथे रुग्णालय बांधण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाणार असल्याचे इच्छुक म्हणाले.
 
प्रभागात आवश्यकता आहे तेथे पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे ९० टक्के काम झाले आहे. प्रभागातील सर्व रस्त्यांचे विकास आराखड्यानुसार रुंदीकरण करून त्यांचे डांबरीकरणही करण्यात आले आहे. संपूर्ण प्रभागात एलईडी दिवे बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रभागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही चांगल्या पद्धतीने पुरविण्यात आली आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यातील कोणत्याही भागात बसने जाण्यासाठी अडचण निर्माण होत नाही. बस संख्याही पुरेशी असल्याने नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाली आहे, असे इच्छुकांनी सांगितले.
 
प्रभागात किरकोळ चोऱ्यांचे प्रकार घडतात. गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. एखादी महिला प्रभागात रात्री-बेरात्री एकटी फिरू शकेल, असे चांगले वातावरण आहे. विकासकामे करताना प्रभागाच्या दोन्ही नगरसेवकांमध्ये चांगला समन्वय असतो. त्यामुळे प्रभागाचा विकास झाला आहे. काही किरकोळ कामे राहिली आहेत. अशी कामे नगरसेवकांनी न सांगताच कार्यकर्ते स्वतः ती मार्गी लावतात. त्यामुळे प्रभागात एक चांगले राजकीय वातावरण आहे. शहरातील इतर प्रभागांच्या तुलनेत पिंपळेगुरव प्रभागात गेल्या चार वर्षांत भरीव आणि चांगली विकासकामे झाली आहेत, असे इच्छुकांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin