Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ५७ - मिशन २०१७ ; पिंपळे गुरव प्रभागातून हे आहेत इच्छूक


Main News

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५७ असलेल्या पिंपळे गुरवमधून 'पीसीबी'च्या 'मिशन २०१७ ; चर्चा तर होणारच' या उपक्रमात श्याम जगताप, निलेश गांगार्डे, योगेश जगताप व शशिकांत कदम यांनी सहभाग घेतला. 

श्याम शांताराम जगताप 
श्याम जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे वय २९ असून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते आमदार लक्ष्मण जगताप यांना राजकीय आदर्श मानतात. मागील महापालिका निवडणुकीच्या वेळी ते इच्छूक होते. मात्र, त्यावेळी आमदार जगताप यांच्या सांगण्यावरुन माघार घेतली होती. आता पुन्हा ते ताकदीनिशी तयारीला लागले आहेत. भैरवनाथ मित्र मंडळ, श्याम भाऊ जगताप मित्र परिवार, जय भवानी मित्र मंडळ, गुलमोहर कॉलनी मित्र मंडळाच्या माध्यमातून ते विविध उपक्रम राबवितात. प्रभागामध्ये सर्व सोई-सुविधा आहेत. पाणीपुरवठा व ड्रेनेज लाईनची क्षमता वाढविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

निलेश ज्ञानेश्वर गांगार्डे
३० वर्षीय निलेश गांगार्डे यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ते माजी उपाध्यक्ष असून मागील १० वर्षांपासून महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. यावेळी निवडणूक लढविण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. हिंदवी मित्र मंडळाच्या माध्यमातून ते विविध उपक्रम राबवितात. प्रभागात सर्व सोई-सुविधा उपलब्ध आहेत. त्या कायम ठेवणे तसेच तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

योगेश रविंद्र जगताप
योगेश जगताप हे देखील बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे वय ३० असून त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. महापालिका निवडणुकीसाठी ते प्रथम इच्छूक आहेत. योगेश जगताप युथ प्रतिष्ठान व बालाजी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते विविध कार्यक्रम घेत असतात. अत्याधुनिक सोई-सुविधांबरोबरच मुबलक पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. 

शशिकांत गणपत कदम 
४६ वर्षीय शशिकांत कदम बांधकाम व्यावसायिक आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत.  गणेश सहकारी बँकेचे ते संचालक असून छत्रपती शिवाजी मंडळ, जय महाराष्ट्र नवरात्र उत्सव मंडळ, संभाजी मित्र मंडळ, महालक्ष्मी महिला मंडळाच्या माध्यमातून ते विविध उपक्रम राबवितात. १९९७ ची महापालिका निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढविली होती. त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर होते. आता ते भाजपकडून तयारी करत आहेत. भाजपच्या जाहिरनाम्यानुसारच काम करु, मूलभूत सोई-सुविधा पुरविण्यावर भर देवू, असे त्यांनी सांगितले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ९६५६ जणांचा पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला तसेच भाजपची ६५०० जणांची सदस्य नोंदणी केल्याची माहितीही त्यांनी दिली. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin