Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ५६ - मिशन २०१७ ; वैदुवस्ती प्रभागामधून हे आहेत इच्छूक


Main News

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५६ असलेल्या वैदुवस्ती प्रभागातून तानाजी जवळकर, मुकेश पवार व अरुण पवार यांनी 'पीसीबी'च्या "मिशन २०१७ ; चर्चा तर होणारच" या उपक्रमात सहभाग घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याविषयी...

 
तानाजी दत्तात्रय जवळकर
३५ वर्षीय जवळकर हे बारावी उत्तीर्ण आहेत. त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. ते भाजयुमोचे उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर एकता विकास प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष आहेत. प्रतिष्ठाणच्या माध्यमातून ते प्रभागात महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवित असतात. तसेच प्रभागात ते मोफत रुग्णसेवा चालवितात. जवळकर यांनी आजवर प्रभागातील विविध समस्यांवर आंदोलने छेडली आहेत. ते २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीस इच्छूक होते. त्यावेळी त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सांगण्यावरुन माघार घेतली होती. प्रभागातील वीज, पाणी, अंतर्गत रस्ते या मूलभूत सुविधांबरोबरच आरक्षणे ताब्यात घेवून विकसित करण्याचा त्यांचा मनोदय आहे. तसेच महापालिकेच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
 
मुकेश राजाराम पवार
पवार एका खासगी शाळेत क्रीडा शिक्षक आहेत. त्यांचे वय ४१आहे. ते शिवप्रताप मित्र मंडळाचे सचिव आहेत. त्याचबरोबर ते वनवासी कल्याण आश्रमाचे काम करतात. मंडळाच्या माध्यमातून ते प्रभागात सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवित असतात. २०१२ मध्ये ते महापालिका निवडणुकीस इच्छूक होते. त्यावेळी त्यांनी माघार घेतली होती. प्रभागात मोठ्या प्रमाणात दुर्बल घटकातील नागरिक आहेत. त्या नागरिकांपर्यंत राज्य सरकारच्या, महापालिकेच्या योजना पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर प्रभाग अतिक्रमण मुक्त करण्याचा त्यांचा मनोदय आहे.
 
अरूण श्रीपती पवार
अरूण पवार हे सांगवी - किवळे भाजपा मंडल अध्यक्ष आहेत. दहावी उत्तीर्ण असून, ते बांधकाम व्यावसायिक आहेत. ते मूळचे मराठवाड्यातील असून, मराठवाडा जनविकास संघ या संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. दरवर्षी मार्च ते जून या कालावधीत ते दुष्काळग्रस्तांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करतात. सोनारी, डोमजा व देऊळगांव याठिकाणी वन्य प्राण्यांसाठी खाद्य व पाणी व्यवस्था तसेच शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य वाटप केले जाते. त्यांना प्रभागाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी नगरसेवक व्हायचे आहे. 
- See more at: https://www.pcbtoday.in/read_banner_news/loadBannerParticularNews/1916#sthash.dVI4g4B7.dpuf

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin