Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ५५ - मिशन २०१७ ; रहाटणी-पिंपळेसौदागर प्रभागातून हे आहेत इच्छूक


Main News

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५५ असलेल्या  रहाटणी-पिंपळेसौदागर प्रभागातून कुंदन जाचक, विशाल जाधव, दिपक नागरगोजे, एकता कांबळे, अमोल काटे, गोपाळ माळेकर यांनी “पीसीबी टुडे”च्या “मिशन २०१७ ; चर्चा तर होणारच” या उपक्रमात सहभाग घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल...
 
कुंदन रामचंद्र जाचक
 
कुंदन जाचक हे ३५ वर्षांचे असून, ते बांधकाम व्यावसायिक आहेत. ते बारावी उत्तीर्ण आहेत. ते नवचैतन्य क्रीडा प्रतिष्ठाणचे खजिनदार, कुंदन जाचक फाऊंडेशनचे संस्थापक, हरित संघटनेचे सदस्य आहेत. त्याचबरोबर जाचक हे उत्कृष्ठ कबड्‌डीपट्टू असून ते पुणे जिल्हा कबड्डी संघाकडून खेळले आहेत. प्रभागात उद्यान, मैदान, भाजीमंडई बांधण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
विशाल अनंतराव जाधव
 
विशाल जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचे वय ३५ असून त्यांनी बीकॉम पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. ते बारा बलुतेदार महासंघाचे युवा प्रदेश संघटक, लॉन्ड्री संघटनेचे कार्याध्यक्ष, जाणिव फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष, शिवशंभो सेवा मंडळाचे सक्रीय सभासद आहेत. जाधव २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीस इच्छूक होते. त्यावेळी त्यांनी माघार घेतली. प्रभागात सांस्कृतिक भवन, खासगी व महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी, पिंपळे सौदागर येथे स्वतंत्र पोलीस ठाणे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
दिपक राजमल नागरगोजे 
 
दिपक नागरगोजे १२ वी उत्तीर्ण आहेत. ते बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे वय ३२ आहे. ते भाजयुमोचे काळेवाडी-सांगवी मंडलाध्यक्ष आहेत. याशिवाय भगवान सेनेचे शहराध्यक्ष, गोपीनाथ प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष, स्माईल प्लस फाऊंडेशनचे सभासद आहेत. ते २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीस इच्छूक होते. त्यावेळी त्यांनी माघार घेतली. प्रभागातील बंद व्यायामशाळा, जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार सुविधा  पोहचविणे, तसेच फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
एकता अशोक कांबळे
 
एकता कांबळे या २७ वर्षांच्या असून, बी.एड. झाल्या आहेत. त्या 'सोलर सिस्टम' प्रकल्पावर काम करतात. त्या प्रथमच महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. कांबळे यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे जाळे बनवले आहे. तरुणांसाठी शिक्षण उपलब्ध करुन देणे, महापालिकेच्या योजना महिलांपर्यंत पोहचवून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
अमोल रघुनाथ काटे
 
अमोल काटे यांचा दुग्धव्यसाय आहे. त्यांचे वय ४३ असून त्यांनी बीकॉमपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते पिंपळे सौदागर गणेश मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. २०१२ मध्ये त्यांचे भाऊ अनिल काटे यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते १८९० मते घेवून दुसऱ्या क्रमांकावर होते. प्रभागातील आरक्षणे ताब्याते घेवून प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे, जेष्ठांना मदत, वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे, सर्व भागाचा समान विकास करण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
गोपाळ काशिनाथ माळेकर
 
गोपाळ माळेकर चिंचवड विधानसभा मतदारसंघ संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे वय ४३ असून दहावी उत्तीर्ण आहेत. त्यांचा वाहतूक व्यवसाय आहे. माळेकर तिरंगा क्रीडा मित्र मंडळ, बळीराज मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. ते २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीस इच्छूक होते. त्यावेळी त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सांगण्यावरुन माघार घेतली होती. प्रभागातील आरक्षणे ताब्यात घेवून प्रभागाचा विकास करणे. युवकांना रोजगार व महिलांना उद्योग निर्माण करुन देण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin