Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ५५ - रहाटणी-पिंपळेसौदागर प्रभागाच्या नगरसेवकांमध्ये “ह्यालागाड-त्यालागाड”ची स्पर्धा


Main News

>> बिल्डरांच्या योगदानामुळे प्रभागाचा चेहरामोहरा बदलला

>> नगरसेवकांमधील वैय्यक्तिक वैमनस्याचा प्रभागाच्या विकासाला फटका

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ५५, रहाटणी-पिंपळेसौदागरमध्ये एकाच पक्षाच्या दोन्ही नगरसेवकांमध्ये “ह्यालागाड आणि त्यालागाडची” स्पर्धा लागली आहे. प्रभागात इमारती उभ्या राहिल्याचे चित्र दिसत असले तरी मुलभूत सोयी सुविधांची बोंबाबोंब आहे. नगरसेवक केवळ टक्केवारी खाण्यासाठी म्हणून काही कामे करतात. तीही निकृष्ट दर्जाची आहेत. केवळ बिल्डरांच्या योगदानामुळे प्रभागाचा चेहरामोहरा बदलला आहे. रहाटणी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मेघडंबरी बसविण्याचा १५ वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्नही नगरसवेकांना सोडविता आलेला नाही. एकाच कामाचे भूमीपूजन किंवा उद्घाटनाचे दोन्ही नगरसेवक वेगवेगळे फोटो काढून केवळ जाहिरातबाजीत मग्न आहेत. दोघांतील वैय्यक्तिक वैमनस्यामुळे प्रभागाचा विकास खुंटला असल्याचे प्रभागातील इच्छुकांनी सांगितले  

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शत्रुघ्न काटे व राष्ट्रवादीच्याच नगरसेविका शितल काटे हे प्रभाग क्रमांक ५५, रहाटणी-पिंपळेसौदागरचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या प्रभागातून विशाल जाधव, कुंदन जाचक, दिपक नागरगोजे, एकता कांबळे, अमोल काटे व गोपाळ माळेकर हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. प्रभागात कमी दाबाने पाणी येते. अनेक भागात पहाटे तीन वाजता पाणी येते. प्रभागात लहान मोठ्या १०० हून अधिक सोसायट्या आहेत. या सोसायट्यांना स्वखर्चाने टँकरने पाणी मागवावे लागते. त्यामुळे नगरसेवकांशी संबंधित असणारे टँकर माफिया वाढले आहेत. टँकर माफियांच्या आर्थिक भल्यासाठी प्रभागात जाणूनबूजून पाण्याची कमतरता भासविली जाते. प्रभागातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून चार वर्षांत पाणीपुरवठ्याची नवीन कामे झालेली नाहीत. गृहप्रकल्पांच्या ठिकाणी बिल्डरांनी स्वखर्चाने पाइपलाइन टाकलेले आहेत, असे इच्छुकांनी सांगितले.

सांडपाणी व्यवस्थेची क्षमता वाढविण्याची कामे झाली आहेत. प्रभागातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. प्रभागात मैलाशुद्धीकरण प्रकल्प असूनही सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. आणखी एक मैलाशुद्धीकरण प्रकल्पासाठी जागा आरक्षित असताना त्याचा ताबा घेतला जात नाही. पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. सोसायट्यांमध्ये सिमेंटचे रस्ते असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पावसाळ्यात सर्व रस्त्यांवर पाणी साचलेले असते. प्रभागातील कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या वेळेवर येत नाहीत. नागरिक मोकळी जागा दिसेल तेथे कचरा टाकतात. कचराकुंड्या पूर्वीच्या जागेतून उचलून महापालिका शाळेच्यामागे ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही लोकांच्या लागेबांध्यातून कचराकुंड्यांची जागा बदलण्यात आल्याचे इच्छुकांनी सांगितले.

प्रभागातील साफसफाईची कामे स्थानिकांनाच देण्यात आली आहेत. ते काम करत नाहीत. त्यामुळे त्यांना काम का होत नाही, हे विचारताही येत नाही. प्रभागाच्या बहुतांश भागात भूमीगत विद्युत व्यवस्था आहे. गावठाण व कॉलनी परिसरात अद्याप भूमीगत विद्युत व्यवस्था नाही. प्रभागातील मुख्य रस्ते वगळता अन्य रस्त्यांचा नगरसेवकांची भाऊबंदकी व वैय्यक्तिक हेवेदाव्यांमुळे विकास रखडला आहे. दुसरीकडे गोरगरीबांच्या पोटावर पाय देऊनही काही रस्ते केले गेले आहेत. दत्तमंदिरासमोरील दलितवस्तीतील घरे पाडून रस्ता केला गेला. त्यांना घरे देण्याचे आश्वासन नगरसेवकांनी दिले होते. प्रत्यक्षात एकाही नागरिकाला घर मिळालेले नाही. बहुतांश अंतर्गत रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. जागा मिळेल तेथेच काम केले जाते. उर्वरित रस्ता अर्धवट ठेवला जातो. रस्ते दर सहा महिन्यांनी खोदले जातात. रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने एक जरी पाऊस पडला की त्यांची दुरवस्था होते, असे इच्छुकांनी सांगितले.

प्रभागात वरवर केल्या जाणाऱ्या कामांचे दोन्ही नगरसेवक दोन वेगवेगळे फोटो काढून केवळ जाहिरातबाजी करण्यात मग्न आहेत. नगरसेवकांमधील कुरघोडीच्या राजकारणामुळे नागरिकांचे मरण होत आहे. प्रभागातून जाणारा बीआरटीएस रस्ता धोकादायक बनला आहे. चौकात सिग्नल नाहीत, याकडे नगरसेवकांचे लक्ष नाही. नगरसेवकांनी केवळ आपल्या हॉटेलचा आणि मंदिरांचा विकास केला आहे. प्रभागातील सर्व पादचारी मार्गावर हातगाड्यांनी अतिक्रमण केले आहेत. नगरसेवकांच्याच परवानगीने हे अतिक्रमण होत आहेत. अगदी सोसायट्यांच्या प्रवेशद्वारासमोरची जागाही हातगाडीधारकांनी गिळंकृत केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हफ्ता गोळा केला जातो. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. प्रभागातील रहाटणी भागात २० आणि पिंपळेसौदागरमध्ये १६ आरक्षणे आहेत. त्यांपैकी एक उद्यान सोडल्यास अन्य आरक्षणांचा विकासच झालेला नाही. या उद्यानाचीही नागरिकांना उपयोग होत नाही. नगरसेवकांनी स्वतःचे कार्यक्रम घेण्यासाठी उद्यान बनविले आहे, असे इच्छुकांनी सांगितले.

प्रभागात स्मशानभूमी आणि मैदान उभारण्याचे काम रडतखडत सुरू आहे. रहाटणीतील २० वर्षापूर्वीचा बसथांबा अक्षरशः कुजला आहे. रहाटणी चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मेघडंबरी बसविण्याचा प्रश्न १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. महापालिकेची शाळा सातवीपर्यंतच आहे. हे सर्व प्रश्न नगरसेवकांना सोडविता आलेले नाहीत. ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी नागरिकांना डस्टबीन वापसाठी आणले होते. परंतु, ते रात्रीच गायब झाले. प्रभागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. महिला व मुली असुरक्षित आहेत. परंतु, पोलिसांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे ते परिणामकारक काम करत नाहीत. महापालिकेच्या योजना नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी नगरसेवक प्रयत्न करत नाहीत. काही मोजक्या जवळच्या नागरिकांनाच योजनांचा फायदा पोचविला जातो. दोन्ही नगरसेवकांमध्ये टोकाचे वैय्यक्तिक मतभेद असल्यामुळे त्यांच्यात “ह्यालागाड-त्यालागाड”ची स्पर्धा लागलेली असते, असे इच्छुकांनी सांगितले.

दोन्ही नगरसेवक व्यावसायिक असल्यामुळे त्यांना नागरिकांना वेळ देता येत नाही. दोघेही पिंपळेसौदागरचे असल्याने रहाटणीचा विकास खुंटला आहे. दोघे केवळ समारंभासाठी रहाटणीत येतात. शाळेसाठी शेजारची २० गुंठे जागाही नगरसेवकांना ताब्यात घेता आलेली नाही. बळीराज कॉलनीतील रस्त्यांचे गेल्या आठ वर्षांत डांबरीकरण झालेले नाही. रायगड कॉलनीत पिण्याच्या पाण्याची २५ वर्षांपूर्वीची पाइपलाइन असल्याने त्यातून दूषित पाणी येते. वारंवार मागणी करूनही नगरसेवक पाइपलाइन बदलण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत नाहीत. प्रभागाचा विकास केवळ बिल्डरांनी केला आहे. एक-दोन मोठे रस्ते आणि मोठ्या गृहप्रकल्पामुळे प्रभागाचा विकास दिसला असला तरी अंतर्गत भागात नागरी सुविधांची बोंबाबोंब आहे, असे इच्छुक म्हणाले.   

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin