Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ५४ - मिशन २०१७; पिंपळेनिलखमधून हे आहेत इच्छुक


Main News

पिंपरी,दि. २१ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५४, पिंपळेनिलखमधून संदीप कस्पटे, तुषार कामठे आणि सुहास बालवडकर हे इच्छुक आहेत. त्यांनी “पीसीबी टुडे”च्या  मिशन २०१७ ; चर्चा तर होणारच या उपक्रमात सहभाग घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याविषयी...

 संदीप अरुण कस्पटे

संदीप कस्पटे हे भाजपचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यांचे वय ३८ असून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते हॉटेल व बांधकाम व्यावसायिक आहेत. साईराज प्रतिष्ठान व संदीप अण्णा कस्पटे युवा मंच तसेच येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे ते संस्थापक आहेत. याखेरीज ५ महिलाबचत गटांचे त्यांनी संघटन केले आहे. ते गतवेळी महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक होते. मात्र, महिला राखीव वॉर्ड झाल्याने त्यांच्याऐवजी त्यांच्या चुलती नंदा कस्पटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यावेळी त्या दुसऱ्या क्रमांकवर होत्या. आता संदीप कस्पटे स्वतः तयारी करत आहेत. प्रभागाचा कायापालट करणे, क्रीडांगण, नाट्यगृह उभारणी, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, नदीपात्र स्वच्छता तसेच बिल्डर व सदनिकाधारकांसाठी समन्वय समिती सुरु करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

 तुषार गजानन कामठे

तुषार कामठे हे बांधकाम व्यावसायिक असून, ते ३३ वर्षांचे आहेत. सुखकर्ता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी एनएसयुआयचे पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि पुणे जिल्हा मराठा महासंघाच्या अध्यक्षपदावर काम केले आहे. त्यांनी २०१२ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून महापालिका निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी २४९५ मतदान झाले होते. प्रभागातील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रिटचे करणे, एकच वेळ पाणी परंतु मुबलक पुरवठा करणे, आरक्षणे विकसीत करणे, सर्व रस्त्यांचे विकास आराखड्यानुसार रुंदीकरण करणे, बुद्ध विहार बांधणे, जेष्ठ नागरीकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे, मुळा नदीच्या सुशोभिकरणासाठी प्रयत्न करणे, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे तसेच युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि मैलाशुद्धीकरण प्रकल्प चांगल्या क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

 सुहास मारूतराव बालवडकर

 सुहास बालवडकर हे ४४ वर्षांचे असून, ते अखिल क्रांतीनगर नवरात्र उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या समितीमार्फत ते प्रभागात क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम राबवित असतात. प्रभागात महापालिकेची केवळ सातवीपर्यंत शाळा आहे. प्रभागाच्या दोन्ही नगरसेवकांच्या खासगी शाळा आहेत. तेथे प्रवेशासाठी भरमसाठ डोनेशन घेतले जाते. त्यामुळे प्रभागातील मुलांना सातवीनंतर पुढील शिक्षणासाठी औंधमध्ये जावे लागते. मुलांची ही शैक्षणिक गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेची दहावीपर्यंतची शाळा सुरू करण्यासाठी नगरसेवक व्हायचे आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच नगरसेवक म्हणून प्रभागाचा सर्वांगिण विकास करायचा असल्याचे ते म्हणाले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin