Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ५४ - पिंपळेनिलख प्रभागाचे नगरसेवक संपर्क क्षेत्राच्या बाहेर; प्रभागात विकासाचा अभाव


Main News

>> आरक्षणांच्या विकासाकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष

>> चार वर्षांत नगरसेवकांनी कोणतेच भरीव काम केले नाही
 
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ५४, पिंपळेनिलखमध्ये गेल्या चार वर्षांत भरीव विकासकामे झालेली नाहीत. पाणी कमी दाबाने येते. कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या वेळेवर येत नसल्यामुळे मोकळी जागा दिसली की नागरिक कचरा टाकतात. प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचा विकास झालेला नाही. अरुंद रस्ते आणि त्यात ते खड्डेमय झाले आहेत. प्रभागातील सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीपात्रात साडले जाते. प्रभागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चार वर्षांत सार्वजनिक प्रयोजनाच्या आरक्षित जागांचा विकास झालेला नाही. दोन्ही नगरसेवकांमध्ये समनव्य नाही. नगरसेवक नागरिकांच्या संपर्कातच नाहीत. त्यामुळे प्रभागात कोणताच विकास झाला नसल्याचे या प्रभागातील इच्छुकांनी सांगितले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विलास नांदगुडे आणि काँग्रेसच्या नगरसेविका आरती चोंधे हे प्रभाग क्रमांक ५४, पिंपळेनिलखचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या प्रभागातून संदिप कस्पटे, तुषार कामठे आणि सुहास बालवडकर हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. प्रभागात कमी दाबाने पाणी येते. नळजोडांना मोटार लावून पाणी ओढले जात असल्याने अनेकांना पाणी उपलब्ध होत नाही. मुळात पाणीच कमी दाबाने येत असल्यामुळे नागरिकांनाही मोटार लावल्याशिवाय पर्याय उरत नाही. वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी गेल्या चार वर्षांत पिण्याच्या पाइपलाइनची कोणतीही कामे झालेली नाहीत, असे इच्छुकांनी सांगितले.
 
प्रभागात भूमीगत सांडपाणी व्यवस्था आहे. परंतु, काही भागात अद्याप खुली गटारे आहेत. वाकवस्ती परिसरात सांडपाणी व्यवस्था नसल्याने रस्त्यावर पाणी सोडले जाते. सांडपाणी व्यवस्था तुंबण्याचे प्रकार कमी घडतात. परंतु, प्रभागातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. प्रभागात मैलाशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नाही. सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. या प्रकल्पाजवळ पाण्याची प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे. तेथून नागरिक जाऊच शकत नाही, अशी परिस्थिती असल्याचे इच्छुक म्हणाले.
 
प्रभागातील कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या दररोज येत नाहीत. दोन ते तीन दिवसांनी गाड्या येतात. तोपर्यंत नागरिकांना घरातच करचा साठवून ठेवावा लागतो. अनेक नागरिक मोकळी जागा दिसली की कचरा टाकतात. कचराकुंड्याही भरलेल्या असतात नंतर दोन-चार दिवसांनी मोकळ्या जागेत टाकण्यात येणारा आणि कचराकुंड्यातील कचरा उचलून नेला जातो. प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. मुख्य रस्ते वगळता अंतर्गत रस्त्यांवर गेल्या चार वर्षांत डांबरच पडलेले नाही. त्यामुळे हे रस्ते खड्डेमय झाले आहेत. गल्लीबोळांमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले आहेत. अनेक रस्ते महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार विकसित करण्यात आलेले नाहीत, असे इच्छुक म्हणाले.
 
प्रभागात भाजी मंडई, पोस्ट ऑफिस आणि उद्यानासाठी आरक्षणे आहेत. परंतु, त्यांचा विकास करण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न केलेले नाहीत. सर्व्हे क्रमांक ६४ मध्ये उद्यान उभारण्याच्या कामाचे २०११ मध्ये भूमीपूजन झाले. प्रत्यक्षात गेल्या सहा वर्षात हे उद्यान साकारलेले नाही. भाजी मंडईच्या जागेचा महापालिकेने अद्याप ताबा घेतलेला नाही. प्रभागातील स्मशानभूमीत पाणी, शौचालय व इतर सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे स्मशानभूमी असूनही त्याचा काहीच उपयोग नसल्यासारखी परिस्थिती आहे. प्रभागात महापालिकेची शाळा सातवीपर्यंतच आहे. प्रभागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दोन्ही नगरसेवकांच्या स्वतःच्या खासगी शाळा आहेत. तेथे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे महापालिकेची शाळा दहावीपर्यंत करण्याची गरज असल्याचे इच्छुकांनी सांगितले.
 
प्रभागाच्या अंतर्गत भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा नाही. त्यामुळे अंतर्गत भागात राहणाऱ्या नागरिकांना मुख्य रस्त्यावर येऊनच या व्यवस्थेचा लाभ घ्यावा लागतो. नदीत जलपर्णी वाढल्यामुळे प्रभागात डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. महापालिकेकडून औषध फवारणी केली जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभागाच्याकडेने नदी असूनही नगरसेवकांना साधे विसर्जन घाट बांधता आलेले नाही. प्रभागात माथाडी संघटनांचे वर्चस्व वाढत असल्यामुळे गुन्हेगारीचेही प्रमाण वाढले आहे. प्रभागाच्या दोन्ही नगरसेवकांमध्ये कोणताही समनव्य नाही. नगरसेवक तर नागरिकांच्या संपर्कातच नाहीत. त्यामुळे गेल्या चार वर्षांत प्रभागामध्ये कोणताही विकास झाला नसल्याचे इच्छुक म्हणाले. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin