Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ५३ - वाकड प्रभागाच्या नगरसेवकांमधील वैयक्तिक मतभेदाचा विकासकामांवर परिणाम


Main News

>> महापालिकेच्या बसथांब्यावर नगरसेविकेने पतीचाही फोटो छापला
>> प्रभागात कामे करण्याऐवजी नगरसेवकांची सुरू आहे “चमकोगिरी”

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ५३, वाकडमध्ये गेल्या चार वर्षांत सर्वाधिक लोकसंख्या वाढली आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येचा विचार करून मुलभूत सोयी सुविधा पुरविण्याचे नियोजन नाही. हिंजवडी आयटी पार्कमुळे प्रभागात उच्चशिक्षितांची मोठी संख्या वाढली आहे. त्यांच्यासाठी साधे जॉगिंग ट्रॅकसुद्धा नगरसेवकांना तयार करता आलेले नाही. नगरसेवकांचेच टँकर असल्याने प्रभागातील सोसायट्यांना पाणीपुरवठा करण्याचा धंदा तेजीत आहे. महापालिकेच्या बसथांब्यांवर नगरसेविकेच्या पतीचाही फोटो छापण्यात आला आहे. प्रभागात विकासकामांऐवजी नगरसेवकांची केवळ “चमकोगिरी” सुरू आहे. दोन्ही नगरसेवकांमध्ये वैयक्तिक मतभेद असल्यामुळे प्रभागाच्या विकासकामांवर परिणाम झाला आहे, असे या प्रभागातील इच्छुकांनी सांगितले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विनायक गायकवाड आणि राष्ट्रवादीच्याच नगरसेविका स्वाती कलाटे हे प्रभाग क्रमांक ५३, वाकडचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या प्रभागातून संदिप कस्पटे, सिद्दीक शेख, विक्रम विनोदे आणि अक्षय कळंबकर हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. प्रभागात पाणीपुरवठ्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. हिंजवडी आयटी पार्कमुळे वाकड भागात राहायला येणाऱ्या संख्या वाढली. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जात नाही. त्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली आहे. प्रभागाला दहा वर्षापूर्वी जेवढा पाणीपुरवठा होत होता, तेवढाच आजही होत आहे. प्रभागात १००-२०० फ्लॅटचे अनेक गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. त्यांना टँकरने स्वखर्चाने पाणी मागवावे लागते. नगरसेवकांचाच टँकरचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांचा धंदा तेजीत आहे. दुसरीकडे काही नागरिक गाड्या धुण्यासाठी आणि उद्यानासाठीही महापालिकेचे पाणी वापरले जाते. त्यावरही कुठेतरी निर्बंध आणणे गरजेचे असल्याचे इच्छुक म्हणाले.

सांडपाणी व्यवस्थेबाबतही नियोजन केले जात नाही. सोसायट्यांची संख्या वाढल्यामुळे सांडपाणी व्यवस्थेची नवीन कामे झाली आहेत. तरीही सांडपाणी तुंबण्याचे प्रकार वारंवार घडतात. म्हातोबानगर, अण्णाभाऊ साठेनगर या झोपडपट्ट्यांमध्ये सांडपाणी व्यवस्था सक्षम करण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले आहे. सांडपाणी तुंबल्यानंतर नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास नगरसेवक मला विचारल्याशिवाय साफसफाई करू नका, असा दम अधिकाऱ्यांना भरतात. भुजबळ वस्ती ते भूमकर वस्ती येथे अजूनही भूमीगत सांडपाणी व्यवस्था नाही. त्यामुळे रस्त्यांवरच दुर्गंधीयुक्त पाणी साचलेले असते. प्रभागातील सांडपाणी व्यवस्था मैलाशुद्धीकरण प्रकल्पाला जोडलेले आहे. प्रभागातील कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या चार-चार दिवस येत नाहीत. आल्या तर वेळेत येत नाहीत. ओला व सुका कचरा वेगळा केला जात नाही. त्यामुळे प्रभागात कचऱ्याची फार मोठी समस्या निर्माण झाल्याचे इच्छुक म्हणाले.

कचरा उचलला जात नसल्यामुळे विविध संघटनांना प्रभागात स्वच्छता अभियान राबवावे लागते. झोपडपट्ट्यांच्या परिसरात तर घंटागाड्या येतच नाहीत. त्यामुळे नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. ८० फूट रस्त्यांवर संपूर्ण कचरा पडलेला असतो. प्रभागातील काही सोसायट्या गांडूळ खत प्रकल्प राबवितात. मुठा नदीच्या स्वच्छतेकडे नगरसेवकांचे लक्षच नाही. विद्युत व्यवस्थेबाबतही भोंगळ कारभार सुरू आहे. प्रभागाच्या २० टक्के भागात विद्युत खांबांना दिवे बसविण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू आहे. प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे विकास आराखड्यानुसार रुंदीकरण झालेले नाही. काही ठिकाणी विद्यमान नगरसवेकांनीच रस्ते अडविले आहेत. बिल्डर, जमीन मालक व त्यांच्या कुटुंबियांमध्ये वाद असल्यामुळे अनेक रस्त्यांचा वाद न्यायालयात गेला आहे. काहींना मोबदला मिळत नसल्यामुळे ते जमीन ताब्यात देत नाहीत. अशावेळी संबंधितांशी संवाद साधून मध्यममार्ग काढण्यासाठी नगरसेवकांकडून प्रयत्न होत नाहीत, असे इच्छुकांनी सांगितले.

अण्णाभाऊ साठेनगर झोपडपट्टीच्या रस्त्याचा प्राधिकरणाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवकांनी पाठपुरावा केलेला नाही. झोपडपट्ट्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. प्रभागात शाळा, भाजी मंडई, उद्यान आणि आर्थिक दुर्बल घटकांच्या गृहप्रकल्पासाठी आरक्षणे आहेत. नगरसेवकांना यांपैकी एकही विकसित करता आलेले नाही. प्रभागात दवाखाना असून, त्याची अवस्था वाइट आहे. व्यायामशाळेत साहित्य नाही. एकाच जागेत महापालिकेच्या तीन शाळा असून, मुख्य रस्ता शाळेच्या परिसरातून गेला आहे. त्यामुळे शाळेचे स्थलांतर होण्याची आवश्यकता आहे. प्रभागात मैदान व जॉगिंग ट्रॅक विकसित होण्याची आवश्यकता आहे. प्रभागात बीआरटीएस रस्ता होऊनही वाहतूककोंडीतून मार्ग सुटलेला नाही. पुणे-मुंबई महामार्गावरील वाकड चौकातील उ्डडाणपूल पाडण्याची आवश्यकता आहे. प्रभागात पार्किंगची कोठेच व्यवस्था नाही. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे, असे इच्छुक म्हणाले.  

प्रभागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खून करणे, सदनिका फोडणे, गाड्या अडवून दमदाटी करणे, सोनसाखळी चोरणे असे प्रकार नित्याचेच घडतात. तसेच टवाळखोरांमुळे विनयभंगाच्या घटनाही वारंवार घडत आहेत. दारूचे अवैध धंदे, मटक्याचे अड्डेही सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभागातील दोन्ही नगरसेवक एकाच राजकीय पक्षाचे आहेत. निवडणूक झाली आणि अंगावर गुलाल पडल्यानंतर दोन्ही नगरसेवकांमधील समन्वय संपला. दोघांतील वैय्यक्तिक मतभेदामुळे प्रभागाच्या विकासावर मोठा परिणाम झाला आहे. नागरिक एका नगरसेवकाकडे समस्या घेऊन गेला की दुसऱ्याला राग यतो. त्यामुळे सर्वसामान्य तक्रार करायलाच घाबरत आहे. नगरसेविकेचे पती तर मतदानासाठी पैसे दिले आहेत. त्यामुळे काम सांगायचे नाही, अशी भाषा करतात. महापालिकेने उभारलेल्या बसथांब्यावर नगरसेविकेने स्वतःसोबत आपल्या पतीचेही फोटो छापले आहेत. दोन्ही नगरसेवक महापालिकेच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाहीत. आपल्या जवळच्या काही ठराविक नागरिकांचा योजनांचा लाभ पोहचविला जातो, असे इच्छुकांनी सांगितले.   

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin