Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ५३ - मिशन २०१७ ; वाकडमधून हे आहेत इच्छूक


Main News

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५३ असलेल्या वाकडमधून संदीप कस्पटे, विक्रम विनोदे, अक्षय कळमकर, सिद्दीक शेख यांनी 'पीसीबी'च्या  मिशन २०१७ ; चर्चा तर होणारच या उपक्रमात सहभाग घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याविषयी...

संदीप अरुण कस्पटे 
संदीप कस्पटे हे भाजपचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यांचे वय ३८ असून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते हॉटेल व बांधकाम व्यावसायिक आहेत. साईराज प्रतिष्ठान व संदीप अण्णा कस्पटे युवा मंच तसेच येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे ते संस्थापक आहेत. याखेरीज ५ महिलाबचत गटांचे त्यांनी संघटन केले आहे. ते गतवेळी महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक होते. मात्र, महिला राखीव वॉर्ड झाल्याने त्यांच्याऐवजी त्यांच्या चुलती नंदा कस्पटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यावेळी त्या दुसऱ्या क्रमांकवर होत्या. आता संदीप कस्पटे स्वतः तयारी करत आहेत. प्रभागाचा कायापालट करणे, क्रीडांगण, नाट्यगृह उभारणी, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, नदीपात्र स्वच्छता तसेच बिल्डर व सदनिकाधारकांसाठी समन्वय समिती सुरु करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. 

विक्रम तुकाराम विनोदे 
विक्रम विनोदे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे वय २९ असून त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, मात्र, राजकारणाची आवड असल्याने ते महापालिका निवडणूक लढवू इच्छित आहेत. नवयुग मित्र मंडळाच्या माध्यमातून ते विविध उपक्रम राबवितात. उद्या, भाजीमंडई, वाचनालय तसेच आरक्षणांचा विकास करण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

अक्षय रामचंद्र कळमकर
२७ वर्षीय अक्षय कळमकर हे वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यांच्या मातोश्री अलका कळमकर या माजी ग्रामपंचायत सदस्या आहेत. माऊली प्रतिष्ठान व अक्षय कळमकर युवा मंचचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. मूलभूत सुविधांची पूर्तता, ड्रेनेज व्यवस्थेची क्षमता वाढविणे, नदी स्वच्छता व सुशोभिकरण, प्राधिकरण संपादित जमिनी विकसित करणे आदी मुद्दे घेऊन प्रचाराला उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

सिद्दीक इस्माईल शेख
सिद्दीक शेख हे सिव्हील इंजिनिअर आहेत. ते खासगी ठिकाणी नोकरी करतात.  त्यांचे वय २८ आहे. अपना वतन संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष असून या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विविध नागरी प्रश्नांवर आंदोलने केली आहेत. २०१४ ची विधानसभा निवडणूक त्यांनी भोसरी मतदार संघातून लढविली होती. त्यात त्यांना अपयश आले. आता ते महापालिका निवडणूक लढवू इच्छित आहेत. नदी स्वच्छता, सार्वजनिक वाहतूक सुधारणे, झोपडपट्टी परिसराचा विकास, कचरा व ड्रेनेजचा प्रश्न सोडविणे, निराधार महिलांचे रोजगाराच्या माध्यमातून पुनर्वसन, युवकांसाठी रोजगार केंद्र सुरु करण्यासाठी आपल्याला निवडणूक लढवायची असल्याचे त्यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin