Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ५२ - मिशन २०१७ ; ताथवडे-पुनावळे प्रभागातून हे आहेत इच्छूक


Main News

पिंपरी. दि. १८ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५२ असलेल्या ताथवडे-पुनावळेमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी आहे. जाणून घेऊयात त्यांच्याविषयीची माहिती...

अजित पोपट पवार - अजित पवार हे वाहतूक व्यावसायिक आहेत. त्यांचे वय ३३ असून ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. त्यांच्या मातोश्री सुभद्रा व वडील पोपट पोपट पवार हे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. साई मित्र मंडळाचे ते अध्यक्ष, प्रेरणा बँकेचे संचालक आहेत. मूलभूत सोई-सुविधांची पूर्तता व शास्तीकराचा प्रश्न सोडवायचा असल्याचे त्यांनी सांगितले. 

रामचंद्र मारुती गायकवाड - रामचंद्र गायकवाड यांचे स्वतःचे वृत्तपत्र आहे. त्यांचे वय ५१ आहे. ते माजी ग्रामपंचायत सदस्य  आहेत. २०१२ ची महापालिका निवडणूक त्यांनी लढविली होती. मात्र, त्यात अपयश आले. त्यामुळे ते पुन्हा तयारी करत आहेत. विकास आराखड्याला मंजुरी, बीआरटीएस प्रकल्पातील त्रुटी दूर करणे, रस्ते विकास करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. 

संतोष सिताराम पवार - ३९ वर्षीय संतोष पवार हे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून ते शेती करतात. ते काँग्रेस क्रीडा सेलचे माजी अध्यक्ष तसेच नरसिंह प्रतिष्ठान, नवजीवन मित्र मंडळ, पोलिस नागरिक समितीचे अध्यक्ष व साई स्कूल समिटीचे सदस्य आहेत. विकास आराखड्याला मंजुरी मिळवून त्याप्रमाणे वॉर्डाचा विकास, पुनावळेतील शाळेचे महापालिकेकडे वर्गीकरण, तळागाळात शासकीय योजना पोहचविणे आदी कामे मार्गी लावायची असल्याचे त्यांनी सांगितले.  

चेतन महादेव पवार - २९ वर्षीय चेतन पवार यांनी वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षापर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते 'रियल इस्टेट' व्यावसायिक आहेत. एनएसयुआयच्या फत्तेचंद जैन कॉलजचे माजी कार्याध्यक्ष, मानवाधिकार संघटनेचे शहराध्यक्ष, रमणनाथ युवा प्रतिष्ठान व अष्टविनायक मंडळाचे अध्यक्ष आहेत. विकास आराखड्याला मंजुरी व त्यांच्या अंमलबजावणीसाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

देवेंद्र चंद्रकांत पवार - देवेंद्र पवार हे कलाशाखेचे पदवीधर आहेत. तच्यांचे वय २७ असून ते शेती करतात. त्यांचे वडील चंद्रकांत पवार हे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. रस्ते, पाणी, विकास आराखड्याला मंजुरी मिळविणे हे आपले उद्दीष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. 

अमर शत्रुघ्न सोनवणे - अमर सोनवणे यांनी कला शाखेच्या व्दितीय वर्षापर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते माजी ग्रामपंचायत सदस्य व पंचशील युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. २०१२ ची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढविली होती. तेव्हा आलेले अपयश यावेळी भरुन काढू, असे त्यांनी सांगितले. येथील शाळा महापालिकेकडे वर्ग करणे, मूलभूत सोई-सुविधांची पूर्तता आणि आरोग्याचा प्रश्न आपण सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

अतुल विजय रानवडे - अतुल रानवडे हे भाजपचे प्रभाग अध्यक्ष आहेत. त्यांचे वय ३३ असून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते शेती करतात. रस्ते विकास, वीज, पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृह या सुविधांना आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. 

अतुल विजय ढवळे - अतुल ढवळे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे वय ३२ असून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. शिवाजी मराठा ग्रुपची त्यांनी स्थापना केली आहे. विकास आराखड्याला मंजुरी, मुबलक पाणीपुरवठा व प्रशस्त रस्ते विकास हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. 

सागर विजय ओव्हाळ - २९ वर्षीय सागर ओव्हाळ यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. सागर युवा मंचचे संस्थापक, अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. विकास आराखड्याचा प्रश्न मार्गी लावणे, रस्ते विकास, सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी तसेच स्थानिकांना महापालिकेच्या कामांचे ठेके मिळावेत, यासाठी आपण आग्रही असल्याचे ते म्हणाले. 

स्वप्निल बाळासाहेब नवले - स्वप्निल नवले हे वाहतूक व्यावसायिक आहेत. त्यांचे वय ३० असून ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. चिंचवड विधानसभा युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष व ताथवडे युवा मंचचे अध्यक्ष आहेत. मूलभूत सोई-सुविधा पुरविणे व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

नवनाथ मारुती नवले - नवनाथ नवले हे उद्योजक आहेत. ते कला शाखेचे पदवीधर असून त्यांचे वय ३६ आहे. राष्ट्रवादीचे माजी शहर सरचिटणीस व शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. आता ते भाजपचे काम करतात. नदीसुधार प्रकल्प राबविणे, महिलांना रोजगार, रुग्णालय, घर तिथे रस्ता अश्या योजना राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. 

राजेंद्र सोपान पवार - राजेंद्र पवार यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे वय ४५ आहे. ते बांधकाम व्यवसाय करतात. ते नरसिंह देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष व युनिक व्हिजन शाळेचे कार्याध्यक्ष आहेत. विकास आराखडा, मुबलक पाणीपुरवठा, वीजेची सोय करण्यासाठी आपण निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचे त्यांनी सांगितले. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin