Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ५१ - शिवसेना खासदारांच्या गणेशनगर-बेलठिकानगर प्रभागात भरीव कामांचा अभाव


Main News

>> प्रभागात बेरोजगारांची संख्या वाढल्याने गुन्हेगारीचेही प्रमाण वाढले
>> पाणीपुरवठ्याच्या नियोजनाकडेही नगरसेवकांचे दुर्लक्ष
 
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ५१, गणेशनगर-बेलठिकानगरमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पाणी कमी दाबाने येते. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन केले जात नाही. सांडपाणी व्यवस्था सक्षम करण्यासाठी गेल्या चार वर्षांत कोणतेच काम झालेले नाही. घंटागाड्या कचरा गोळा न करताच निघून जात असल्यामुळे नागरिक मोकळ्या जागेत कचरा टाकतात. त्याची साफसफाई होत नाही. मुख्य रस्ते वगळता अंतर्गत रस्त्यांचे चार वर्षांत डांबरीकरण झालेले नाही. प्रभागात स्वच्छतागृहे उभारण्याची आवश्यकता आहे. गेल्या चार वर्षांत प्रभागात कोणतेच भरीव काम झाले नसल्याचे या प्रभागातील इच्छुकांनी सांगितले.
 
शिवसेना खासदार व नगरसेवक श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका माया बारणे हे प्रभाग क्रमांक ५१, गणेशनगर-बेलठिकानगरचे प्रतिनिधित्व करत आहेत. या प्रभागातून हरिष मोरे, अॅड. सचिन भोसले हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या "टीम"ने संवाद साधला. प्रभागातील काही भागात नियमित दाबाने, तर काही भागात कमी दाबाने पाणी येते. कमी दाबाने पाणी येणाऱ्या भागातील नागरिक मोटार लावून पाणीउपसा करतात. त्यामुळे अनेक नागरिकांच्या नळजोडांना पाणीच येत नाही. प्रभागाच्या प्रत्येक भागाला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी योग्य नियोजन केले जात नाही. गेल्या चार वर्षांत पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनचे कोणतेच काम झालेले नाही, असे इच्छुकांनी सांगितले.

प्रभागाच्या काही भागात भूमीगत, तर काही भागात मोकळी सांडपाणी व्यवस्था आहे. सांडपाणी व्यवस्था अनेकदा तुंबण्याचे प्रकार घडतात. साफसफाईची काळजी घेतली जात नाही. शिव कॉलनी, मंगलनगर आणि गुजरनगर भागात सांडपाणी तुंबण्याचे प्रकार सातत्याने घडतात. ही समस्या सोडविण्याचाही प्रयत्न होतो. परंतु, समस्या कायमचीच सोडविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे सांडपाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होते. सांडपाणी व्यवस्था सक्षम करण्यासाठी चार वर्षांत कोणतेच प्रयत्न झालेले नाहीत. प्रभागातील कचरा उचलण्यासाठी दररोज घंटागाड्या येतात. परंतु, अनेकदा कचरा न घेताच घंटागाड्या जात असल्यामुळे नागरिक नाइलाजाने रस्त्यावर मोकळी जागा दिसेल तेथे कचरा टाकतात, असे इच्छुक म्हणाले.
 
प्रभागातील सर्वच रस्त्यांचा विकास झालेला नाही. अंतर्गत रस्ते अजूनही अरूंद आहेत. मुख्य रस्ते वगळता अंतर्गत रस्त्यांवर चार वर्षात डांबरच पडलेले नाही. प्रभागातील विविध कॉलन्यांमधील रस्ते करण्याकडे नगरसेवकांचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अनेक रस्ते खड्डेमय बनले आहेत. रस्ते विविध कामांसाठी खोदल्यानंतर पुन्हा ते दुरूस्त केले जात नाहीत. काही रस्त्यांवर स्पीड ब्रेकर बसविण्याची आवश्यकता आहे. त्याकडेही नगरसेवक लक्ष देत नाहीत. अंतर्गत रस्ते विकास आराखड्यानुसार बनविले गेलेले नाहीत. मुख्य रस्त्यांचेही चार वर्षांत एकदाच डांबरीकरण केले गेले आहे. रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत, असे इच्छुकांनी सांगितले.
 
प्रभागात एक उद्यान, दवाखाना, वाचनालय, शाळा, बॅडमिंटन हॉल आणि जलतरण तलाव आहे. या सर्वांचा नागरिकांना चांगला उपयोग होत आहे. परंतु, उद्यानात अजूनही काही कामे अपूर्ण आहेत. जलतरण तलाव कधी बंद, तर कधी सुरू असते. त्यामुळे त्याचा नागरिकांना नियमित वापर करता येत नाही. दवाखान्यांमध्ये सुविधा अपूर्ण आहेत. एक हॉल बांधून पडून आहे. इतरही काही आरक्षणे प्रभागात असून, त्यांचा विकास झालेला नाही. प्रभागात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याची आवश्यकता आहे. येथील विद्यार्थ्यांना पुण्यात जावे लागते. त्यांची गैरसोय होत आहे. नगरसेवकांनी स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे इच्छुक म्हणाले.
 
प्रभागातून जाणाऱ्या सांगवी ते किवळे बीआरटीएस रस्त्यावरच भाजीबाजार भरत असल्याने वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रभागात एक भाजीमंडई होण्याची आवश्यकता आहे. प्रभागात बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हाताला काम नसल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये गुन्हेगारी विश्वाबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे. परिणामी प्रभागात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. घरफोड्या, सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची प्रयत्न होणे गरजेचे आहेत. तसेच प्रभागात पोलिसांचे पेट्रोलिंगचे प्रमाण वाढविणेही गरजेचे असल्याचे इच्छुकांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin