Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ५१ - मिशन २०१७ ; गणेशनगर-बेलठिकानगरमधून हे आहेत इच्छूक


Main News

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५१, गणेशनगर-बेलठिकानगरमधून हरिष मोरे आणि अॅड. सचिन भोसले हे आहेत इच्छुक. त्यांनी “पीसीबी टुडे” च्या “मिशन २०१७ ; चर्चा तर होणारच” या उपक्रमात सहभाग घेतला. जाणून घेवूयात त्यांच्याबद्दल...
 
हरिष भिकोबा मोरे
मोरे भाजपचे शहर उपाध्यक्ष आहेत. त्यांचे वय ४७ असून ते दहावी उत्तीर्ण आहेत. त्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. मोरे यापूर्वी भाजपचे वॉर्ड अध्यक्षही होते. युवक एकता संघ व जनसेवा प्रतिष्ठाणचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. प्रतिष्ठाणच्या माध्यमातून ते प्रभागात समाजोपयोगी उपक्रम राबवितात. प्रभागात भाजी मंडई, स्वच्छतागृह बांधण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच डांगे चौकात भुयारी मार्ग बांधण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
अॅड. सचिन सुरेश भोसले 
अॅड. सचिन भोसले हे ३५ वर्षांचे असून, ते वकिली व्यवसाय करतात. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुख्य सरचिटणीसपदावर काम केले आहे. न्यू आझाद युवक संघ आणि अॅड. सचिनभाऊ भोसले युवा मंचचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच त्यांच्या पत्नी जिजाऊ महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. या तीनही संघटनांच्या माध्यमातून ते प्रभागात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. प्रभागाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी त्यांना नगरसेवक व्हायचे आहे. नागरिकांना मुलभूत सोयी सुविधांच्या कोणत्याही समस्या जाणवू नयेत, यासाठी त्यांना काम करायचे आहे. प्रभागातील सांडपाणी व्यवस्था सक्षम करणे, वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी बेरोजगार युवक तसेच महिलांनाही रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी व्हायचे असल्याचे ते म्हणाले. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin