Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ४९ - मिशन २०१७ ; प्रभाग क्रमांक ४९ मधून हे आहेत इच्छूक


Main News

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४९ असलेल्या श्री साई मंदिर-श्री बापुजीबुवानगर प्रभागातून नामदेव पवार, संदीप गाडे, तानाजी बारणे, गणेश भिगवणकर, संतोष बारणे आणि तुषार नाणेकर यांनी 'पीसीबी'च्या "मिशन २०१७ ; चर्चा तर होणारच" या उपक्रमात सहभाग घेतला. 

नामदेव भगवान पवार - नामदेव पवार हे जेसीबी कंपनीमध्ये कार्यरत आहेत. जेसीबी कामगार संघटनेचे ते माजी सरचिटणीस आहेत. त्यांचे वय ३८ असून त्यांनी आयटीआय केला आहे. भाजपचे ते मंडल सरचिटणीस व मराठवाडा विकास संघाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. मूलभूत सोई-सुविधांची पूर्तता, महापालिकेतील भ्रष्टाचार रोखणे, गुंडगिरीला आळा घालणे हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. 

संदीप काशिनाथ गाडे - संदीप गाडे हे उद्योजक आहेत. त्यांनी वाणिज्य शाखेच्या व्दितीय वर्षापर्यंतचे त्यांनी शिक्षण घेतले असून त्यांचे वय ३४ आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांना ते राजकीय आदर्श मानतात. भाजपचे ते प्रभाग अध्यक्ष म्हणून कार्यरत असून महापालिका निवडणुकीसाठी प्रथमच इच्छूक आहेत. प्रभागाला विकासाचे मॉडेल म्हणून तयार करणे, प्राधिकरणबाधितांना न्याय मिळवून देणे, ड्रेनेज व्यवस्थेत सुधारणा करणे, नागरी सुविधा सक्षम करणे आदी कामे मार्गी लावण्यासाठी आपण निवडणुकीस इच्छूक असल्याचे गाडे यांनी सांगितले. 

तानाजी हरिभाऊ बारणे - ४० वर्षीय तानाजी बारणे यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते शेती करतात. जय महाराष्ट्र स्पोर्टस असोसिएशन, बापुजी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संघर्ष स्पोर्टस्‌ असोसिएशनचे आधारस्तंभ म्हणून ते कार्यरत आहेत. प्राधिकरणमुक्त प्रभाग, स्वच्छ व सुंदर प्रभाग तसेच सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे बारणे यांनी सांगितले. 

गणेश हरिभाऊ भिगवणकर - गणेश भिगवणकर हे थेरगावमध्ये महा-ई सेवा केंद्र चालवितात. ते विशेष कार्यकारी अधिकारी असून प्राधिकरण मुक्त जनआंदोलन संघाचे अध्यक्ष, पुणे जिल्हा ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष, कुंभार समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष व कैलास मित्र मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वय ४० असून त्यांनी एमए पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. जुनाट जलवाहिन्या बदलणे, रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज व्यवस्थेची क्षमता वाढविणे, कचरा गाड्या प्रभागातून हटविणे, प्रभाग स्वच्छ व सुंदर करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. 

संतोष गुलाब बारणे - संतोष बारणे हे ड प्रभागाचे माजी स्विकृत सदस्य आहेत. त्यांचे वय ३२ असून त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते हॉटेल व्यावसायिक आहेत. जय महाराष्ट्र स्पोर्टस असोसिएशनचे संस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत. मला कोणताही राजकीय वारसा नाही. मात्र, समाजकारणाची आवड असल्याने राजकारणातून समाजकारण करण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

तुषार तानाजी नाणेकर - ३० वर्षीय तुषार नाणेकर यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. श्रीनाथ मित्र मंडळ, शंभूराजे प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष असून साद फाऊंडेशनच्या माध्यमातून ते विविध उपक्रम राबवितात. समाजकार्य करण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin