Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ४८ - मिशन २०१७ ; तापकीरनगर-श्रीनगरमधील असे आहेत इच्छूक


Main News

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४८, तापकीरनगर-श्रीनगरमधून राकेश नखाते, मारुती दाखले, अनिल नखाते, राज तापकीर आणि शुभम नखाते या इच्छूकांनी 'पीसीबी'च्या मिशन २०१७ ; चर्चा तर होणारच या उपक्रमात सहभाग घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याविषयी...
 
राकेश हरीभाऊ नखाते
राकेश नखाते यांचा खासगी व्यवसाय आहे. त्यांनी २०१२ ची महापालिका निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती. त्यावेळचे अपयश भरुन काढण्यासाठी आता पुन्हा तयारीला लागले आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांना ते राजकीय गुरु मानतात. राष्ट्रवादी चिंचवड विधानसभा अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. आपल्याला युवकाचा दांडगा पाठिंबा असल्याचा दावा ते करतात. वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षापर्यंतचे त्यांनी शिक्षण घेतले असून त्यांचे वय २७ आहे. रहाटणीसाठी स्वतंत्र पोलिस चौकी, छत्रपती संभाजी महाराज उद्यानाला वाहनतळाची सोय उपलब्ध करुन देणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांची बांधणी, नवीन जलवाहिन्या टाकून मुबलक पाणीपुरवठ्याची सोय आदी मुद्दे घेऊन प्रचारात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मारुती भगवान दाखले 
मारुती दाखले हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले असून त्यांचे वय ३६ आहे. २०१२ ची महापालिका निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर लढविली होती. त्यावेळी अपयश आले. आता पुन्हा ते तयारीला लागले आहेत. विद्यार्थी सेनेचे माजी विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र राज्य दलित युवक महासंघाचे ते संस्थापक आहेत. मूलभूत सोई-सुविधांना आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

अनिल भाऊसाहेब नखाते
अनिल नखाते हे हॉटेल व बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे वय ३४ असून ते पदवीधर आहेत. शिवराज तरुण मंडळाचे ते संस्थापक, अध्यक्ष आहेत. त्यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मागील आठ-दहा वर्षात प्रभागाचा विकास पूर्णतः खुंटला आहे. विद्यमान नगरसेवकांचे प्रभागाकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रभागाला प्रगतीपथावर आणण्याबरोबरच मूलभूत सोई-सुविधांची पूर्तता, अनधिकृत बांधकाम, शास्तीकराचा प्रश्न सोडविणे तसेच शासकीय योजना सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छूक असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज हेमंत तापकीर
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर यांचे राज हे नातू आहेत. त्यांचा राजकीय वारसा जपण्यासाठी तसेच त्यांच्या स्वप्नातील विकास साधण्यासाठी निवडणूक लढविण्यास इच्छूक असल्याचे राज तापकीर यांनी सांगितले. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून त्यांचे वय २४ आहे. नवयुवक मित्र मंडळाचे ते अध्यक्ष आहेत.  समाजकारणासाठी राजकारणाला आपण महत्त्व देत असल्याचेही ते म्हणाले. 

शुभम चंद्रकांत नखाते
शुभम हे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांचे चिरंजिव आहेत. त्यांचे वय २१ असून ते सिव्हील इंजिनिअरींग करत आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण राजकारणात आलो आहोत. वडिलांची प्रभागाच्या विकासाची अधुरी राहिलेली स्वप्न आपल्याला पूर्ण करायची असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रभागातील रस्त्यांचा विकास आणि गुंडगिरी थांबविणे हे आपले ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin