Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ४८ - तापकीरनगर-श्रीनगर प्रभागाचे नगरसेवक विकासकामांऐवजी “शोबाजी”त मग्न


Main News

>> प्रभागात मुलभूत सोयी सुविधा सक्षम करण्यात नगरसेवक अपयशी
>> आरक्षणांचा विकास तर दूरच चार वर्षांत स्वच्छतागृह उभारता आले नाही

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ४८, तापकीरनगर-श्रीनगरमध्ये चार वर्षांत कोणताही विकास न करणारे नगरसेवक आता निवडणूक जवळ आल्यामुळे कामांचे भूमीपूजन आणि उद्घाटन करत आहेत. नगरसेविकेचे पती नागरिकांच्यासमोर अधिकाऱ्यांना जोरजोरात बोलून केवळ “शोबाजी” करण्यात पटाईत आहेत. गेल्या चार वर्षांत प्रभागातील एकाही आरक्षणाचा किंवा ना रस्त्याचा चांगला विकास झाला आहे. नगरसेवकांना प्रभागात एक शौचालयही उभारता आलेले नाही. पाणी, सांडपाणी व्यवस्था, रस्ते आणि इतर मुलभूत सोयी सुविधांची बोंबाबोंब आहे. नगरसेवकांचे लक्ष केवळ टक्केवारीवर असून, त्यातून मिळालेला पैसै पुढच्या निवडणुकीत वापरण्याचा त्यांचा इरादा असल्याचा आरोप या प्रभागातील इच्छुकांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कैलास थोपटे आणि राष्ट्रवादीच्याच नगरसेविका अनिता तापकीर हे प्रभाग क्रमांक ४८, तापकीरनगर-श्रीनगर प्रभागाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या प्रभागातून राकेश नखाते, राज तापकीर, शुभम नखाते, मारूती दाखले आणि अनिल नखाते हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. प्रभागातील काही भागाला पाण्याचा व्यवस्थित पुरवठा होतो. काही भागाला नगरसेवकच पाणीपुरवठा करू देत नाहीत. नगरसेवक आपणाला मतदान न झालेल्या भागात कमी दाबाने पाणी सोडण्यास भाग पाडतात. प्रभागाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या क्षमतेत वाढ करण्याचे नियोजन नाही. आजही २० वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या ४ व ६ इंची पाइपलाइनमधून पाणीपुरवठा होत आहे. काही भागात टँकरने पाणी मागवावे लागते. प्रभागात जादा क्षमतेच्या पाइपलाइन टाकण्याची गरज इच्छुकांनी व्यक्त केली.

प्रभागात सांडपाणी व्यवस्थेची परिस्थिती बिकट आहे. भूमीगत सांडपाणीचे चेंबर एकदा चोकअप झाल्यानंतर दोन-दोन दिवस साफसफाई होत नाही. प्रभागात तयार होणारे रोजचे सांडपाणी मैलाशुद्धीकरण प्रकल्पाला न जोडता थेट नदीपात्रात सोडण्यात आले आहे. चार वर्षांत सांडपाण्याची कोणतीच कामे केली गेली नाहीत. तापकीरनगरमध्ये काही भागात आजही खुले गटार आहेत. त्या भूमीगत करण्यासाठी नगरसेवकांनी पाठपुरावा केलेला नाही. प्रभागाल मैलाशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. प्रत्यक्षात कामाला सुरूवात होत नाही. प्रभागातील नाले नगरसेवकांनी बिल्डरांशी संगनमत करून गिळंकृत करून टाकले आहेत. श्रीनगर, नखातेनगर येथील नाल्यांवर बिल्डरांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत. नगरसेवकांच्या संमतीशिवाय हे शक्य नसल्याचे इच्छुक म्हणाले.

प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या वेळेवर येत नाहीत. आल्या तर कचरा न घेताच निघून जातात. त्यामुळे नागरिक रस्त्याच्याकडेला व नाल्यांमध्ये कचरा टाकतात. हॉटेलमधील टाकाऊ अन्न सुद्धा रस्त्यावरच टाकला जातो. प्रभागात अनेक भागात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. रस्त्यावर कचरा टाकू नये यासाठी नगरसेवकांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. प्रभागात आमदार निधीतून भूमीगत विद्युत व्यवस्था करण्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे. परंतु, नगरसेवक कामाचे नारळ फोडून श्रेय घेण्याचे काम करत आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी चार वर्षे झोपा काढल्या का?, असा प्रश्न नागरिकांना पडला असल्याचे इच्छुकांनी सांगितले.

प्रभागातील एकाही रस्त्याचे काम विकास आराखड्यानुसार झालेले नाही. रस्ते अरूंद आहेत. अनेक रस्त्यांचा अद्याप ताबा घेण्यात आलेला नाही. २००६ मध्ये रस्त्यांची कामे झाली. त्यानंतर रस्त्यांचा विकास झालेला नाही. बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अपघातही झाले आहेत. आता निवडणुका आल्यानंतर डांबरीकरणाचे नारळ फोडले जात आहेत. रस्ते करताना विशिष्ट ठिकाणीच स्पीड ब्रेकर बसविण्याची काळजी घेतली गेली आहे. रहाटणी फाटा ते पिंपळेसौदागर हा रस्ता बीआरटीएस रस्ता म्हणून का म्हटले जाते, हेच कळत नाही. या रस्त्यावरील सायकल ट्रॅक गायब झाला आहे. शाळा, उद्यान, रुग्णालय यासाठी प्रभागात आरक्षण आहे. रुग्णालयाच्या जागेत घरे बांधली गेली आहेत. उद्यानाचे आरक्षण असलेल्या जागेत पत्राशेड उभारून तेथे कामगारांना अनधिकृतपणे राहू दिले जात असल्याचे इच्छुक म्हणाले.

प्रभागात एका बिल्डरने संभाजी उद्यान विकसित करून नंतर ते महापालिकेच्या ताब्यात दिले. या जागेसाठी महापालिकेने दोघांना टीडीआर दिला. तरीही किती जागा ताब्यात आली आणि किती जागेत उद्यान आहे, याबाबत साशंकता आहे. उद्यानाच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही. तापकीरनगर भागात तर मैदान, उद्यान किंवा इतर सार्वजनिक प्रयोजनासाठी कोणतेच आरक्षण नाही. रहाटणी गावठाणात उभारण्यात आलेली व्यायामशाळा मोडकळीस आली आहे. शाळेसाठी आरक्षित असलेली जागा एका खासगी शैक्षणिक संस्थेला देण्यात आली. तेथे गोरगरीबांच्या मुलांना प्रवेश मिळत नाही. या जागेत महापालिकेनेच शाळा उभारण्याची गरज आहे. प्रभागात दोन ग्रंथालये कागदोपत्री दाखवून त्याचे अनुदान लाटले जात आहे. रहाटणी गावातील महापालिकेची शाळा सातवीपर्यंतच आहे. ती दहावीपर्यंत करण्याची गरज इच्छुकांनी व्यक्त केली.

प्रभागाच्या दोन्ही नगरसेवकांमध्ये विकासकामे करताना कोणताही समन्वय नसतो. कामांच्या निविदा काढण्यासाठीच त्यांच्यात समन्वय होतो. दोन्ही नगरसेवकांनी आपापला परिसर वाटून घेतला आहे. आता निवडणूक जवळ आल्यामुळे विकासकामांचे नारळ फुटत आहेत. नारळ फोडल्यानंतर कामे पूर्ण करण्याऐवजी ती अर्धवट सोडली जात आहेत. रस्त्याला दुभाजक बसविण्याचे काम अवघ्या पाच दिवसांत बंद करण्यात आले. नगरसेविकेच्या पतीची केवळ “शोबाजी” सुरू आहे. नागरिकांच्यासमोर अधिकाऱ्यांना आवाज वाढवून बोलतात. खूप काम करत असल्याचा आव आणला जात आहे. प्रभागातील वाहतुकीवर कोणतेही नियंत्रण आणले जात नाही. तीन-चार मंगल कार्यालयांमुळे प्रभागातील नागरिक बाहेर पडूच शकत नाही, अशी परिस्थिती आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. प्रभागात गुन्हेगारी वाढली आहे. पोलिस चौकीला जागा असून ती विकसित केली जात नसल्याचे इच्छुकांनी सांगितले. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin