Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ४७ - मिशन २०१७ ; काळेवाडी प्रभागातील असे आहेत इच्छूक


Main News

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४७ असलेल्या काळेवाडीतून  बालाजी पांचाळ, किरण नढे, संदिप सुर्वे, नितीन बनसोडे, हणुमंत सुतार या इच्छूकांनी 'पीसीबी'च्या 'मिशन २०१७ ; चर्चा तर होणारच' या उपक्रमात सहभाग घेतला. जाणून घेऊयात कसे आहेत हे इच्छूक...


बालाजी माणिकराव पांचाळ 
बालाजी पांचाळ याचे वय ४२ असून त्यांनी बीए पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांचे महा ई सेवा केंद्र आहे. पांचाळ मनसेच्या काळेवाडी रस्ते आस्तापणा विभाचे विभागप्रमुख आहेत. त्याचबरोबर ते काळेवाडी व्यापारी असोशिएषनच्या उपाध्यक्ष पदावरही कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी अनिता पांचाळ यांनी २०१२ मध्ये मनसेच्या तिकीटावर महापालिका निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्या चौथ्या क्रमांकावर होत्या. प्रभागात जागा उपलब्ध करुन मुलांसाठी क्रिंडागण करण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छातागृह, अंतर्गत रस्ते रुंद करण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

किरण बालाजी नढे 
किरण नढे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रभाग अध्यक्ष आहेत. त्यांचे वय २५ असून त्यांनी एफवाय बीकॉमपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांचा वाहतूक व्यवसाय आहे. नढे प्रथमच महापालिका निवडणूक लढवू इच्छित आहेत. ते  अचानक मित्र मंडळ आणि कै. विशालभाऊ नढे युवा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष आहेत. मंडळाच्या माध्यमातून ते प्रभागात सामाजिक उपक्रम राबवितात. प्रभागात भाजी मंडई, महिलांसाठी स्वच्छतागृह, सुसज्ज रुग्णालय, मुस्लीम बांधवांसाठी दफनभूमी तसेच  महापालिकेची शाळा बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी ''पीसीबी''शी बोलताना सांगितले. 

संदिप विठ्ठल सुर्वे 
३१ वर्षीय सुर्वे यांचा वाहतूकीचा व्यवसाय आहे. त्यांनी एफवाय बीकॉमपर्यंत शिक्षण घेतले आहे. ते प्रथमच महापालिका निवडणूक लढवू इच्छित आहेत. सुर्वे हे यापूर्वी शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आहेत. सध्या ते भाजपचे काम करतात. सुर्वे यांनी शिवसेनेत असताना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासंदर्भात वेळोवेळी आंदोलने छेडली आहेत. ते सिध्दीविनायक मित्र मंडळ आणि सिध्दीविनायक को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष आहेत. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांबरोबरच अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नितीन सखाराम बनसोडे 
बनसोडे शेतकरी कामगार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत. त्यांचे वय ३० असून त्यांचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. त्यांनी १२ वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. ते प्रथमच महापालिका निवडणूक लढवू इच्छित आहेत. ते भारमाता प्रतिष्ठाण आणि भाग्यवंती देवी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. मंडळाच्या माध्यमातून ते शिवजयंती उत्सव, नवरात्र, गणोशोत्सव असे विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रम घेत असतात. प्रभागात अंतर्गत रस्ते, उद्याण, स्वच्छातागृह, जलतरण तलाव, क्रिंडागण, ''सीसीटीव्ही'' कॅमेरे बसविण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

हणुमंत कृष्णा सुतार 
सुतार शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यांचे वय ५१ असून त्यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. सुतार मयुरेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि विश्वदीप नागरी पतसंस्थेचे संचालक आहेत. याशिवाय ते काळेवाडीतील राधाकृष्ण मंदिर समितीचे कोषाध्यक्षही आहेत. २०१२ मध्ये त्यांच्या पत्नी जयश्री सुतार यांनी शिवसेनेच्या तिकीटावर महापालिकेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी १५०० मते घेवून त्या तीसऱ्या क्रमांकावर होत्या. प्रभागात भाजीमंडई, वाहनतळ, स्वच्छातागृह, जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, रुग्णालय उभारण्यासाठी नगरसेवक व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच फुटपाथवरील  रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याचा त्यांचा मनोदय आहे.

आकाश सुखलाल भारती

आकाश भारती हे स्थापत्य अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत. ते १९ वर्षांचे असून, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीसपदावर काम करत आहेत. तसेच माँ होलकीदेवी प्रतिष्ठानचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात विद्यमान नगरसेवकांना अपयश आले आहे. त्यामुळे या समस्या सोडविण्यासाठी त्याना नगरसेवक व्हायचे आहे. रस्ते, सांडपाणी व्यवस्था सक्षम करण्यासाठी लोकप्रतिनिधी व्हायचे आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin