Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


एअर इंडियाच्या विमानांमध्ये महिलांसाठी राखीव आसने


Main News

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) - भारताची राष्ट्रीय हवाई कंपनी एअर इंडियाच्या विमानांमध्ये महिलांसाठी राखीव आसने ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १८ जानेवारीपासून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या विमानांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती एअर इंडियाचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक अश्वानि लोहानी यांनी दिली. 

याबाबत माहिती देताना लोहानी म्हणाले की, जगात पहिल्यांदाच अशाप्रकारे विमानांमध्ये महिलांसाठी आसने राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विमानाच्या पुढच्या भागातील दोन रांगा किंवा सहा आसने आरक्षित करण्यात येणार आहेत. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. एअर इंडियाच्या विमानांमध्ये देण्यात येणारे हे आरक्षण इकॉनॉमी क्लासपुरते मर्यादित असेल. सध्या अनेक महिला विमानाने एकट्याने प्रवास करतात. त्यामुळे महिला प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षितरीत्या प्रवास करता यावा, यासाठी हा घेण्यात आल्याचे लोहानी यांनी सांगितले. 

गेल्या महिन्यात एअर इंडियाच्या मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात एक प्रवासी इकॉनॉमी क्लासमध्ये बसलेल्या महिलेच्या शेजारी जाऊन बसला. त्यानंतर ती झोपली असताना या प्रवाशाने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर एकट्याने विमान प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी एअर इंडियाने हा निर्णय घेतला  आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin