Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


रिझर्व्ह बँकेचे सर्व निर्णय पंतप्रधानच घेतात - अमर्त्य सेन


Main News

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) - जुन्या नोटा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेली ३० डिसेंबरची मुदत ‘हा रिझर्व्ह बँकेचा निर्णय होता, असे मला वाटत नाही. हा पंतप्रधानांचा निर्णय असू शकतो. कारण सध्या रिझर्व्ह बँक काही निर्णय घेते आहे, असे वाटत नाही,’ अशा शब्दांमध्ये नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी सरकारच्या रिझर्व्ह बँकेमधील वाढत्या हस्तक्षेपावर बोट ठेवले आहे. रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित येणारे सर्व निर्णय पंतप्रधान मोदींकडून घेतले जात असल्याचे सेन यांनी सांगितले.

रघुराम राजन गव्हर्नर पदावर असताना रिझर्व्ह बँक स्वायत्त संस्था होती. या संस्थेच्या प्रमुखपदी आय. जी. पटेल आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या प्रतिभावंतांनी काम केले आहे. रघुराम राजन यांच्याआधी माजी गव्हर्नर वाय. व्ही.  रेड्डी आणि बिमल जलान यांच्यासारख्या व्यक्तींनी गव्हर्नरपदी काम करताना रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता टिकवली होती,’ असे सांगून अमर्त्य सेन यांनी विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

काळ्या पैसा नष्ट करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. त्यावरही सेन यांनी टीका केली. ‘चलनाच्या स्वरुपात फक्त ६ टक्के काळा पैसा जमा होता. या फक्त ६ टक्के काळ्या पैशासाठी सरकारने ८६ टक्के नोटा चलनातून रद्द केल्या,’ असे सेन यांनी म्हटले. ‘काही लोकांनी मिळून नोटाबंदीचा निर्णय घेतला. भारत हा देश लोकशाहीच्या माध्यमातून चालत असल्याने या निर्णयाआधी किमान राज्य सरकारांसोबत चर्चा करायला हवी होती,’ असेदेखील सेन यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी काळ्या पैशाबद्दल काहीतरी करत आहेत, असे लोकांना वाटत आहे. त्यामुळे मोदींना संशयाचा फायदा मिळत राहिल. नोटाबंदीमुळे धनाढ्य आणि श्रीमंतांना त्रास होतो आहे, असे मोदी सांगत आहेत. ही गोष्ट गरिब जनतेला भावते आहे,’ असे सेन यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin