Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


मानवी तस्करीत २००० च्या नोटेचा सर्वाधिक वापर - कैलाश सत्यार्थी


Main News

भोपाळ, दि. १२ (पीसीबी) - नोटाबंदीनंतर मानवी तस्करीला आळा बसेल, असे सुरुवातीला वाटत होते, परंतु या व्यवसायात आता २००० च्या नोटेचा सर्वाधिक वापर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे, अशी खंत नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली. दोन महिन्यातच या व्यवसायातील लोकांकडे २००० च्या नोटा आल्या आहेत आणि त्याचा वापर आता व्यवहारांसाठी होत आहे, असे सत्यार्थी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

यावेळी ते म्हणाले की,  मुलांची आणि महिलांची तस्करी थांबावायची असेल तर अनेक उपाययोजना होणे आवश्यक आहे. देशामध्ये मानवी संबंधी कायद्यांमध्ये सुधारणा होणे आवश्यक असून हे कायदे पीडितांना समजून घेणारे असायला हवेत. यामध्ये तक्रार निवारणाबद्दल तरतुदी असणे आवश्यक आहे, असे सत्यार्थी यांनी सांगितले.

बचपन बचाओ आंदोलन या संस्थेचे प्रमुख सत्यार्थी यांचा काल ६३ वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांनी मानवी तस्करी, बाल कामगार या प्रश्नांवर चर्चा केली. पश्चिम बंगालमध्ये घरगुती कामांसाठी नोकरभरतीच्या अनेक खोट्या संस्था काम करतात या संस्थामार्फत मानवी तस्करी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा या प्रकारांना आळा बसण्यासाठी शासनाने पडताळणीची प्रक्रिया कठोर करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. तसेच जनतेनी देखील जागरुक राहणे आवश्यक आहे. अशा प्रकारांबाबत समजताच जनतेनी पोलिसांना संपर्क करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

दरम्यान, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि मानवी तस्करी या तिन्ही गोष्टी एका फटक्यात कमी झाल्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहरादून येथे झालेल्या कार्यक्रमात म्हटले होते. कैलाश सत्यार्थी यांनी त्यांच्या बचपन बचाओ आंदोलन या संस्थेच्या माध्यमातून हजारो मुलांची बेकायदेशीर मजुरी आणि तस्करीच्या जाचातून सुटका केली आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin