Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


जलीकट्टूबाबत निर्णय देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार


Main News

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) - जलीकट्टूवरील निर्बंध उठविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली असून पोंगल सणाच्या आधी जलकट्टूबाबत निर्णय द्यावा, अशी मागणी या  याचिकेत करण्यात आली आहे. मात्र  पोंगलच्या आधी जलीकट्टूबाबत निर्णय देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाचा मसुदा तयार केला आहे. या निर्णयाचे वाचन शनिवारी होणार आहे. शनिवारीच पोंगल सण आहे. त्याआधी जर निर्णय दिला तर जलीकट्टूची तयारी करायची की नाही याबाबत स्पष्टता निर्माण होईल. त्यामुळेच हा निर्णय शनिवार आधी देण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती.

 २०१४ साली प्रथम जलीकट्टू या सणावर न्यायालयाने बंदी घातली होती. या खेळामध्ये बैलांची हेळसांड होते आणि कित्येक लोक जखमी होतात. म्हणून काही संस्थांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली होते. त्यांच्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने जलीकट्टूवर निर्बंध घातले होते.

जलीकट्टू या सणाला केंद्र सरकारने समर्थन दिले आहे परंतु न्यायालयाच्या आदेशानंतरच या खेळाचा विचार केला जाईल असे केंद्राने म्हटले. सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय घेऊन तामिळनाडूच्या लोकांच्या भावनांचा आदर करेल अशी आशा केंद्र सरकारने व्यक्त केली होती. हा पारंपारिक सण आहे आणि तामिळनाडूतील जनतेची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तो खेळता येईल असे म्हटले होते. जलीकट्टूची तयारी आम्ही सुरू केली असून केवळ न्यायालयाच्या आदेशाची आपण वाट पाहत आहोत असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी म्हटले आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin