Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


पंजाब, गोवा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर


Main News

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) - पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली मतदार यादी जाहीर केली. केंद्रीय आरोग्या मंत्री जे.पी नड्डा यांनी आज पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली. यात पंजाबसाठी १७ तर गोव्यासाठी २९ उमेदवारांची घोषणा केली आहे. पंजाबमध्ये २३ जागांवर भाजप आपला उमेदवार उभा करणार असून ९४ जागांवर भाजपचा मित्रपक्ष शिरोमणी अकाली दल त्यांचे उमेदवार उभे करणार आहे. 

पंजाबमध्ये गेली १० वर्षं सत्तेवर असणाऱ्या भाजप- शिरोमणी अकाली दलाला यंदा अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसण्याची शक्यता आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने चांगली कामगिरी केली तर राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला कमबॅक करायला अनुकूल वातावरण तयार होईल. पण भाजप आणि काँग्रेसला ‘आप’ फॅक्टरचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  पंजाबमध्ये सत्ता मिळाली तर ‘फक्त दिल्लीपुरता मर्यादित असणारा पक्ष’ अशी आपली प्रतिमा पुसून काढायला 'आप'ला मदत होईल. 

भाजपच्या आजच्या पत्रकार परिषदेत नड्डा यांनी गोवा विधानसभा निवडणुकांसाठीही २९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. सध्या या राज्यात भाजप सत्तेवर आहे. यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने माजी इन्स्पेक्टर जनरल एल्विस गोम्स यांचे नाव पुढे केले आहे. गोव्याच्या राजकारणातून राष्ट्रीय पातळीवर गेलेल्या केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. त्यांच्या या होमपीचवर भाजपची कामगिरी कशी राहते, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin