Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


बीएसएफनंतर सीआरपीएफच्या जवानाचा व्हिडीओ; सुविधा मिऴत नसल्याची मांडली व्यथा


Main News

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) - सीमा सुरक्षा दलाचे जवान तेजबहादूर यादव यांनी निकृष्ट दर्जाच्या अन्नाची आणि असुविधाची व्यथा मांडणारा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर आता केंद्रीय राखीव पोलीस(सीआरपीएफ) दलाच्या जवानाने फेसबूकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. माऊंट अबूमध्ये तैनात असणाऱ्या २६ वर्षीय जीत सिंह यांनी लष्कर आणि सीआरपीएफला मिळणाऱ्या सोयी सुविधांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सीआरपीएफकडून लष्काराइतकीच महत्वाची कामगीरी बजावली जाते. मात्र सुविधा पुरवताना दुजाभाव का केला जातो? असा सवाल जीत सिंह यांनी व्हिडीओच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

मुळचे मथुराचे असणारे जीत सिंह सध्या अबूमध्ये कर्तव्य बजावत आहेत. सीआरपीएफचे जवान देखील लष्काराच्या जवानांइतक्याच प्रतिकूल परिस्थितीत दिवसरात्र काम करतात. मग त्यांना सुविधा देताना भेदभाव का केला जातो? असा प्रश्न उपस्थित करताना जीत सिंह यांनी पंतप्रधान मोदींनी या प्रश्नात लक्ष घालावे, असे आवाहन जीत सिंह यांनी केले आहे.

लोकसभेच्या निवडणुक असो अथवा ग्राम पंचायतीच्या आम्ही सर्व निवडणुकांच्यावेळी तैनात असतो. संसद भवन, विमानकळ, मंदिरे, मस्जिद यांच्या सुरक्षेसाठी आम्हाला तैनात केले आहे. व्हिआयपींच्या सुरक्षेसाठीदेखील सीआरपीएफच्या जवानांना पाचारण केले जाते. मात्र लष्करी जवानांच्या तुलनेत सीआरपीएफच्या जवानांना कमी सुविधा दिल्या जातात, असे जित सिंह यांनी व्हिडीओत म्हटले आहे.

सरकारी महविद्यालयांमध्ये प्रध्यापकांना दरमहा ५० ते ६० हजार रुपये वेतन दिले जाते . या प्रध्यापकांना सण आणि उत्सव काळात सुट्टी मिळते. मात्र देशभरात सण उत्सव साजरे केले जात असताना सीआरपीएफचे जवान छत्तीसगडच्या दाट जंगलांमध्ये, काश्मीरच्या प्रतिकूल परिस्थितीत असतात. मात्र इतक्या वाईट परिस्थितीत राहणाऱ्या सीआरपीएफच्या जवानांना पुरेशा सुविधा दिल्या जात नाही, असे जीत सिंह यांनी म्हटले आहे.

लष्काराच्या जवानांना निवृत्ती वेतन मिळते. मात्र निमलष्करी दलाच्या जवानांना २० वर्षाच्या सेवेनंतरही कोटा आणि वैद्यकीय सुविधा मिळत नाही. लष्काराच्या जवानांना सीआरपीएफच्या जवानांपेक्षा अधिक सुविधा मिळतात. लष्कराच्या जवानांना मिळणाऱ्या सुविधांबद्द्ल तक्रार नाही. मात्र तशाच सुविधा सीआरपीएफच्या जवानांना मिळाव्यात, अशी मागणी जीत सिंह यांनी केली आहे.   


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin