Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


पत्रकारांना पाहून आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा पळ


Main News

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) -  व्हायब्रंट गुजरात संमेलनात सहभागी होण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल बुधवारी  ( दि.११ ) गांधीनगरमध्ये आले होते. यावेळी उर्जित पटेल महात्मा मंदिरात गेले होते. यावेळी त्या ठिकाणी बरेच पत्रकार उपस्थित होते. नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना उर्जित पटेल यांना अनेक प्रश्न विचारायचे होते. पत्रकार प्रश्नांची सरबत्ती करणार, याचा अंदाज उर्जित पटेल यांना आला आणि त्यांनी महात्मा मंदिराच्या मागील दरवाज्याने पळ काढला. असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

पत्रकारांचे प्रश्न टाळण्यासाठी उर्जित पटेल यांनी मंदिराच्या मागील दरवाज्याचा वापर केला. मात्र तरीही काही पत्रकारांनी उर्जित पटेल यांना पाहिले. उर्जित पटेल यांना प्रश्न विचारण्यासाठी पत्रकार शिड्यांकडे धावले. मात्र पत्रकार येत असल्याचे पाहताच उर्जित पटेल वेगाने धावू लागले. काही पायऱ्या सोडत अगदी ट्रेन पकडण्यासाठी धावत असल्याप्रमाणे उर्जित पटेल गाडीकडे धावू लागले. अखेर उर्जित पटेल त्यांच्या गाडीजवळ पोहोचले. त्यांनी पटकन गाडीचा दरवाजा उघडला, ते गाडीत बसले आणि गाडी वेगाने निघून गेली.

दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या नोटाबंदीच्या निर्णयावरुन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनादेखील विरोधाला सामोरे जावे लागले. नोटाबंदीच्या निर्णयाच्या सव्वा महिन्यानंतर उर्जित पटेल रिझर्व्ह बँकेच्या एका बैठकीसाठी कोलकात्याला गेले होते. त्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ‘उर्जित पटेल गो बॅक, उर्जित पटेल हाय हाय,’ अशा घोषणादेखील देण्यात आल्या.

पटेल यांच्या दौऱ्यावेळी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचा जोरदार निषेध नोंदवला. नव्या नोटांचा पुरेसा पुरवठा न झाल्याने रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयासमोर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. रिझर्व्ह बँकेच्या संचालकांच्या बैठकीसाठी उर्जित पटेल कोलकात्याला आले होते. रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयासमोर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी उर्जित पटेल यांना काळे झेंडे दाखवले. नोटाबंदीचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी तृणमूलकडून हे आंदोलन करण्यात आले होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin