Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


अॅमेझॉनवर तिरंग्याची पायपुसणी विक्रीला; कडक कारवाईचा केंद्राचा इशारा


Main News

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – अमेझॉनच्या कॅनडातील वेबसाईटवर तिरंग्यासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली आहेत. त्याविरोधात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन निशाणा साधला आहे. स्वराज यांनी अमेझॉन वेबसाईटवर कारवाईचे संकेत दिले आहेत. तसेच कॅनडातील भारतीय दुतावासाला अॅमेझॉनवर कारवाई करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.

नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लोकांच्या समस्या सोडवणाऱ्या सुषमा स्वराज यांना ट्विट करुन तिरंग्यासारख्या पायपुसण्याची माहिती एका व्यक्तीने दिली होती. त्याची लगेच दखल घेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अमेझॉनवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

अॅमेझॉनने तिरंग्यासारख्या पायपुसण्याची विक्री लगेच थांबवावी. तसेच भारताच्या तिरंग्याच्या अवमाननाप्रकरणी  माफी मागावी, असे आपल्या ट्विटमध्ये स्वराज यांनी म्हटले आहे. अमेझॉनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला व्हिजा देणार नसल्याचेही सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. सध्या ज्या अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांकडे भारताचा व्हिजा आहे. त्यांचा व्हिजा रद्द करणार असल्याचे स्वराज यांनी सांगितले आहे.

अमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या तिरंग्यासारख्या पायपुसणीसोबतच इंग्लंडच्या झेंड्याच्या रंगाचीही पायपुसणी विक्रीस ठेवण्यात आली आहे. सोशल मीडियावरुन या वेबसाईटच्या पेजचे स्क्रीनशॉट काढून व्हायरल केले जात आहेत. सोशल मीडियावर तिरंग्याचे स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin