Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


तिहारमधील पुरुषांच्या तुरुंगासाठी प्रथमच महिला जेलर !


Main News

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – देशातील सर्वात मोठा आणि सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या तिहार तुरुंगातील पुरुषांच्या तुरुंग अधीक्षिका आयपीएस अंजू मंगला या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तिहारच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. या पूर्वी तिहार तुरुंगाचे महासंचालक म्हणून किरण बेदी आणि विमला मेहरा यांनी काम केले आहे. हे अगदी उच्च पातळीवरचे काम असल्याने त्यांचा थेट तुरुंगातील कैद्यांशी संबध येत नव्हता. मात्र नव्याने नियुक्त झालेल्या अंजू मंगला यांची पुरुषांच्या तुरुंगाच्या अधीक्षक म्हणून नेमणूक झाल्याने त्यांचा दररोज पुरुष कैद्यांशी संपर्क राहणार आहे.

या तुरुंगात १८ ते २१ वयोगटातील ८०० कैदी आहेत. जेलर हा शब्द कठोर वाटत असल्याने आपल्याला जेलर न संबोधता अधीक्षक म्हणून संबोधण्यात यावे. असे अंजू मंगला यांनी म्हटले. या पूर्वी महिलांच्या तुरुंग अधीक्षक म्हणून काम पाहिलेल्या अंजू मंगला सांगतात की, पुरुष कैदी असो किंवा महिला कैदी त्यांच्याशी वैयक्तिकरित्या चांगला संवाद साधने ही आपली कामाची पध्दत आहे. कैदी माझी मुले असल्यासारखे मी समजते. तुरुंगात कैदी म्हणून आलेल्या या तरुणांमध्ये मोठी उर्जा आहेत. मात्र चुकीच्या मार्गाच्या दिशेला गेल्यामुळे त्यांची रवानगी येथे झाली आहे. तुरुंगात कैद्यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात.

पुरुषांच्या तुरुंगाची जबाबदारी हे आपल्यासाठी एक आव्हान असून महासंचालक सुधीर यादव यांनी आपल्यावर हा विश्वास टाकल्याने आपण ही जबाबदारी स्वीकारल्याचे मंगला यांनी सांगितले. तिहार तुरुंगात असताना शिक्षण सुटलेल्या कैद्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin