Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


सहारा डायरी प्रकरणाची याचिका फेटाळली; पंतप्रधान मोदींना दिलासा


Main News

नवी दिल्ली,  दि. ११ (पीसीबी) - सहारा आणि बिर्ला डायरी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य नेत्यांची चौकशी करणाऱ्या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. प्रशांत भूषण यांनी ही याचिका दाखल केली होती.  मात्र ठोस पुरावे नसल्याचे सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.


सहारा आणि बिर्ला समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाने २०१४मध्ये छापा  टाकला होता. या छाप्यात काही डायरी सापडल्या होत्या. यात २००३मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना २५ कोटी रुपयांची लाच दिल्याचा उल्लेख करण्यात आला होता.  याशिवाय अन्य तीन मुख्यमंत्र्यांना लाच दिल्याचे म्हटले होते. यासंदर्भात प्रशांत भूषण यांनी कागदपत्रे चौकशीसाठी सादर केली होती. मात्र ही कागदपत्रे पुरेशी नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याच डायरीच्या आधारावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर आरोप केले होते.

दरम्यान, न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांचा कोणताही उपयोग नाही. याचिका दाखल करणाऱ्या सीपीआयएल या संघटनेने ठोस पुरावे सादर करावेत असेही न्यायालयाने सांगितले.

">

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin