Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


काँग्रेसला २०९० साल उजाडले तरी सत्ता मिळणार नाही - व्यंकय्या नायडू


Main News

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा २०१९ साली सत्तेत येण्याचा दावा ऐकून मला आश्चर्य वाटले. मात्र, २०१९ तर विसराच २०९० साल उजाडले तरी काँग्रेस सत्तेत येऊ शकणार नाही, असा टोला केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी लगावला.

राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच भारतात अच्छे दिन आणू शकेल, असा दावा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांपूर्वी अच्छे दिन आणण्याचे वचन दिले होते. परंतु त्यांना हे आश्वासन पूर्ण करता आले नाही, असे राहुल यांनी जनवेदना आंदोलनादरम्यान म्हटले होते. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय केवळ स्वतःच्या हट्टासाठी घेतला गेला.  नोटाबंदीच्या निर्णयाचे एकाही अर्थतज्ज्ञाने समर्थन केले नाही. अर्थतज्ज्ञांनी या निर्णयाचा विरोधच नव्हे तर थट्टा केली आहे. तसेच पेटीएम म्हणजे ‘पे टू मोदी’ असे सांगत राहुल यांनी मोदींच्या डिजिटल व्यवहारांच्या घोषणेचीही खिल्ली उडविली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप मिळून देशाचे नुकसान करत आहेत. देशात द्वेष पसरवून आणि निश्चलनीकरणाचा निर्णय घेऊन ते हा हेतू साध्य करू पाहत आहेत, असा आरोपही यावेळी राहुल यांनी केला. 

दरम्यान या टीकेला प्रत्युत्तर देताना नायडू म्हणाले की, राहुल गांधी २०१९ साली सत्तेत येण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत. ते त्यांचे स्वप्न २०९० पर्यंत पूर्ण होणार नाही, असा टोला लगावला.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin