Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


भारताच्या अर्थवस्थेची वाढ ७ टक्क्यांनी होणार- जागतिक बॅंक


Main News

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी)- नोटांबंदीमुळे येत्या वर्षी भारताच्या अर्थव्यस्थेवर परिणाम होणार असल्याचे जागतिक बॅंकेने म्हटले आहे. यावर्षी भारतीय अर्थवस्थेची वाढ ७ टक्के असा अंदाज जागतिक बॅंकेने वर्तवला आहे. याआधी भारताची अर्थव्यस्था ७.६% वाढणार असल्याचा अंदाज जागतिक अंदाज जागतिक बॅंकेने व्यक्त केला होता. पण आता वाढीचे हे प्रमाण कमी राहणार असल्याचे जागतिक बॅंकेने स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी अर्थसचिव शश्किकांत दास यांनी भारतीय अर्थवस्था ७.१ टक्क्यांनी वाढणार असल्याचं म्हटलं होतं. पण म्हणण्यानुसार अर्थवस्थेची वाढ आणखी कमी दराने होणार आहे.

पण याचबरोबर भारतीय अर्थवस्थेची वाढ सशत्क राहणार असल्याचेही जागतिक बॅंक म्हणाली आहे. आतापर्यंत भारतामधले ८०% व्यवहार नोटांनी होत असल्याने अचानक झालेल्या या नोटाबंदीने पुढच्या काही काळासाठी ग्रामीण अर्थवस्थेवर तसंच घरगुती व्यहारांवर नोटाबंदीचा परिणाम जाणवले असं जागतिक बॅंकेने म्हटले आहे.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सरकार घडवू पाहत असलेल्या आर्थिक सुधारणांवरही नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम यापुढे काही काळ जाणवणार असल्याचे जागतिक बॅंक म्हणाली. जीएसटी आणि भूसुधारणा कायघाच्या अमंलबजावणीवरही याचा परिणाम होणार आहे. ८ नोव्हेंबरला झालेल्या नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये डिसेंबर महिन्याच्या शेवटी २२० अब्ज रुपये जमा झाले असल्याचा अंदाज आहे. यामुळे व्याजदरांध्ये घट होण्याची शक्यता आहे.

नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम अनेक क्षेत्रांमध्ये जाणवला. डिसेंबर महिन्यात वाहनखरेदीवरही हा परिणाम दिसून आला. डिसेंबर महिन्यात वाहनखरेदीवरही हा परिणाम दिसून आला. डिसेंबर महिन्यात गेल्या १६ वर्षातली नीचांकी वाहनखरेदी झालेये. वर्षाच्या शेवटी कारडीलर्सनी अनेक सवलती जाहीर करुनही ग्राहकांनी वाहनखरेदी अतिशय थंडा प्रतिसाद दिला आहे. वाहन उत्पादक संघटनेने सष्टेंबरमध्ये प्रवासी वाहन विक्री वाढीचा अंदाज व्यत्क केला होता. यानुसार २०२६-१७ मध्ये प्रवासी वाहन विक्री १० ते १२ टक्क्यांनी वाढेल, नमुद करण्यात आले होते. यापूर्वीचा या गटातील वाहन विक्रीच्या वाढीचा अंदाज ११ ते १३ टक्के असेल, असे म्हटले होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin