Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल बूट भिरकावल्याने जखमी


Main News

मुक्तसर, दि. ११ (पीसीबी) - पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्यावर एका व्यक्तीने बूट भिरकावला. त्यामुळे बादल यांचा चष्मा तुटला असून त्यांच्या चेहऱ्याला जखम झाली आहे. त्यावेळी बादल यांच्या हातात पाण्याचा ग्लास होता. तोही खाली पडला. बूट फेकणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बादल हे लंबी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

बादल लंबी विधानसभा मतदारसंघातील रत्ता खेडा गावात बुधवारी सकाळी प्रचारासाठी सुरू असलेल्या संगत दर्शन कार्यक्रमासाठी आले होते. त्याचवेळी त्यांच्यावर बूट भिरकावण्यात आला. यापूर्वी बादल यांचा मुलगा आणि उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्या ताफ्यावर गेल्या रविवारी फाजिल्कामधील कंधवाला हाजर खां मध्ये दगडफेड झाली होती. 

ताफ्यावर १५ ते २० तरुणांनी दगडफेक केली होती. गावातील काही लोकांना काही मुद्द्यांवर चर्चा करायची होती. पण त्यांचे म्हणणे ऐकले नाही, त्यामुळे ते नाराज झाले. त्यानंतर काही लोकांनी सुखबीरसिंग बादल यांच्या ताफ्यावर दगडफेकही सुरू केली.


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin