Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


नोटाबंदीचा निर्णय हा भाजप, मोदींच्या शेवटाची नांदी - मनमोहन सिंग


Main News

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) - नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची खूप मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक रणनीती पूर्णतः फसली असून मोदींच्या पोकळ आश्वासनांची पोलखोल झाली आहे. नोटाबंदीचा निर्णय ही भारतीय जनता पक्ष आणि मोदींच्या शेवटाची नांदी असेल. मोदी हे गेली दोन वर्षे भारताची अर्थव्यवस्था कशी असेल याची आखणी करीत होते, परंतु ती परिणामकारक ठरली नसल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली.

जनवेदना आंदोलनावेळी बोलताना मनमोहन सिंग म्हणाले की, नोटाबंदी ही भाजपच्या अंताची सुरुवात आहे.  मोदी यांनी दिलेली सर्व वचने पोकळ होती. मोदी म्हणत होते की ते भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकतील, परंतु आता त्यांच्या म्हणण्यातील अर्थ कळत असल्याचे सिंग यांनी सांगितले.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारताचा वृद्धिदर हा ६.३ टक्क्यांच्या खाली जाणार असल्याचे भाकीत जगातील सर्व प्रमुख संशोधन संस्थांनी केले आहे. तेव्हा येणारा काळ कठीण असणार आहे. या एकाच उदाहरणावरुन कळू शकेल ही नोटाबंदीमुळे किती नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसातील परिस्थिती खराब होती परंतु आता ती दयनीय होत असल्याचे मनमोहन सिंग यांनी सांगितले.

दरम्यान या कार्यक्रमामध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर टीका केली होती. मोदी हे पद्मासन करीत नाहीत अशी टीका राहुल यांनी केली होती. पंतप्रधानांना पद्मासन येवो की न येवो परंतु त्यांनी पूर्ण देशाला नोटाबंदीचा निर्णय आणून शीर्षासन करायला लावल्याचा खोचक टोमणा काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी या कार्यक्रमादरम्यान मारला.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin