Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


नोटाबंदीच्या निर्णयाआधी मंत्रिमंडळ ओलीस होते - पी. चिदंबरम


Main News

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) - नोटाबंदीचा निर्णय हा मंत्रीमंडळाच्या सहमतीने घेण्यात आलाच नव्हता, त्यावेळी सर्व मंत्र्यांना ओलीस ठेवण्यात आले होते, अशी टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे. ते जनवेदना आंदोलनादरम्यान बोलत होते.  

यावेळी चिदंबरम म्हणाले की, जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी टीव्हीवर घोषणा करत नाहीत, तोपर्यंत सर्व मंत्र्यांना ओलीस ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. नोटाबंदीचा निर्णय फसला असून त्यातून काहीही साध्य झाले नाही. या निर्णयामुळे केवळ लोकांच्या त्रासात भर झाल्याची टीका त्यांनी केली.

मला या गोष्टीची माहिती हवी आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेनी नेमके केव्हा आपल्या संचालकांना नोटीस पाठवली, त्यांनी त्यांना नेमका किती वेळ दिला याबाबतची माहिती लवकर उघड करण्यात यावी, असे आवाहन पी. चिदंबरम यांनी केले. एक व्यक्ती येते आणि म्हणते मी फ्युरर आहे, मी हुकूमशहा आहे आणि सर्वजण त्या व्यक्तीच्या म्हणण्याला दुजोरा दिला जातो. अशी परिस्थिती भारतात निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. 


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin