Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


बेरोजगार ग्राफिक डिझायनरने छापल्या सहा लाखांच्या बनावट नोटा, शाईने फोडले बिंग


Main News

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) - बेरोजगार ग्राफिक डिझायनरने दोन हजार आणि पाचशे रुपायाच्या बनावट नोटा छापल्याचा प्रकार उघडकीस आला. नोटांवरील शाईमुळे या ग्राफिक डिझायनरचे बिंग फुटले असून याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी डिझायनर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.

काही दिवसांपूर्वी दिल्लीत राहणारा २५ वर्षाचा ग्राफिक डिझायनर कृष्णन भारव्दाज हा तरुण एका दुकानात खरेदीच्या निमित्ताने गेला होता. त्याने दुकानदाराला २ हजाराची बनावट नोट दिली. मात्र दुकानदाराला नोटेवरील शाईवर संशय आला आणि त्याने याप्रकरणाची माहिती ओळखीतील एका पोलिस हवलदाराला दिली. मग पोलिस तपासात दोन तरुणांनी सुरु केलेल्या या उद्योगाचा उलगडा झाला.

नजाफगड आणि उत्तमनगरमध्ये बनावट नोटा चलनात आल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यामुळे दुकानदाराकडुन माहिती मिळताच पोलिसांचा भारद्वाजवरील संशय बळावला. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पोलिसांनी भारद्वाजच्या घराची झाडाझडती घेतली असता घरातुन दोन हजार आणि पाचशेच्या तब्बल ६ लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळला. याशिवाय प्रिंटरही जप्त करण्यात आले. बनावट नोटा छापण्यासाठी भारव्दाजने २५ हजार रुपये खर्च केले होते.

भारव्दाज हा ग्राफिक डिझायनर असून त्याचा सहकारी हा आशिष मोबाईल टेक्निशिन आहे. उच्च दर्जाच्या स्कॅनर आणि प्रिंटरच्या मदतीने नोटा छापून ते बाजारात पसरवत होते. आशिषने पैशांसाठी हे कृत्त केले. तर भारव्दाजला मात्र राजकीय महत्कांक्षा असून यासाठीच तो पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग शोधत होता. सध्या हे दोघेही तुरुंगात आहेत.

संगणकाचे उत्तम ज्ञान असलेल्या भारव्दाजने यापूर्वी शिक्षक म्हणूनही काम केल्याचे पोलिस तपासात समोर आले. भारव्दाज आणि आशिषची दोन वर्षांपूर्वी भेट झाली होती. एका हॉलिवूड चित्रपटातुन प्रेरणा घेत हे दोघे बनावट नोटोंच्या क्षेत्रात उतरले. काही महिन्यांमध्ये दोघांमध्ये वाद झाला आणि त्यांची पार्टरशिप मोडली. पण नोटाबंदीनंतर हे दोघेही नोटा छापण्यासाठी एकत्र आले. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin