Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


काँग्रेसच देशात अच्छे दिन आणू शकेल - राहुल गांधी


Main News

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांपूर्वी अच्छे दिन आणण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते पूर्ण करू शकलेले नाही. केवळ काँग्रेसच देशात अच्छे दिन आणू शकेल, असा विश्वास काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे व्यक्त करून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. 

येथे आयोजित जनवेदना आंदोलनादरम्यान बोलताना राहूल गांधी म्हणाले की,  भारताच्या पंतप्रधानांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर इतका कधीच उपहास झाला नव्हता.  मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय केवळ स्वतःच्या हट्टासाठी घेतला गेला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचे एकाही अर्थतज्ज्ञाने समर्थन केलेले नाही. हा देश केवळ मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत चालवत आहेत. मोदी यांना लोकशाहीचे फार काही महत्त्व वाटत नाही. त्यामुळेच ते विरोधी पक्ष असो वा सल्लागार असो त्यांच्या मताला किंमतच देत नाही, असे राहुल यांनी म्हटले. 

 मोदी यांनी अनेक योजना वाजत गाजत आणल्या परंतु त्यांची अंमलबजावणी मात्र केली नाही. मोदी आणि त्यांचे सहकारी हे केवळ ढोंग करतात. पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी झाडू अशा रीतीने पकडतात की खरा झाडू मारणारा व्यक्ती ते तात्काळ समजू शकेल. त्यांच्या झाडुवरील पकडीवरुनच कळते के ते ढोंग करीत आहेत. इतकेच नव्हे तर योगा देखील ते ढोंग म्हणूनच करतात असे कळते. सर्वांनी योगा केला परंतु कुणीही पद्मासन केले नाही. याचे काय कारण असू शकेल. कारण जो नियमित योगा करतो तो पद्मासन करू शकतो परंतु इंडिया गेटला झालेल्या कार्यक्रमादरम्यान ते पद्मासन करीत असल्याचे मला तर दिसले नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

काँग्रेसच्या काळात माध्यमांवर कधीच दबाव टाकला जात नव्हता. माध्यमांच्या स्वातंत्रावर आम्ही कधीच गदा आणली नाही परंतु मोदींच्या काळात माध्यमांचा आवाज दाबल्या जात असल्याची टीका त्यांनी केली.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin