Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याकडून रेशनचा काळाबाजार!


Main News

श्रीनगर, दि. ११ (पीसीबी) - भारतीय जवानांना पुरवल्या जाणाऱ्या निकृष्ट अन्नाबाबतचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट करून तेज बहादूर यादव या जवानाने गौप्यस्फोट केला होता. श्रीनगरमधील काही नागरिकांनी त्याच्या आरोपांना पुष्टी देणारा धक्कादायक खुलासा केला आहे. सीमा सुरक्षा दलाचे काही अधिकारी आपल्याला बाजारभावापेक्षा अर्ध्या किंमतीत इंधन आणि धान्य विकतात, असा गंभीर दावा बीएसएफ तळांच्या आसपास राहणाऱ्या रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. 

बीएसएफ जवानांसाठी सरकारकडून पुरेसा धान्यपुरवठा होतो. परंतु, हे सामान सैनिकांपर्यंत पोहोचत नाही. कारण, काही अधिकारी दुकानांशी संधान साधून हे अन्नधान्य त्यांना कमी किंमतीत विकून स्वतःचे खिसे भरतात, असा आरोप तेज बहादूर यादवने केला होता. त्यावरून बीएसएफने त्याचा आरोप फेटाळून लावून उलट त्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन बुधवारपर्यंत त्याबाबतचा अहवाल मागवला आहे.

दरम्यान एका बीएसएफ जवानाने आणि हुमहमा येथील बीएसएफ मुख्यालयाजवळ राहणाऱ्या नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर बीएसएफ अधिकाऱ्यांचा गोरखधंदा उघड केला आहे. हे अधिकारी जवानांसाठी आलेले रेशन स्थानिक बाजारात विकतात, तसेच एअरपोर्टजवळच्या दुकानदारांना इंधन विकले जाते, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे. हुमहमा कॅम्पचे अधिकारी आम्हाला बाजारभावापेक्षा अर्ध्या किंमतीत पेट्रोल आणि डिझेल विकतात. त्याशिवाय, तांदूळ, मसाले, डाळी यासारखे पदार्थही आम्हाला अत्यंत कमी भावाने मिळत असल्याचेही त्याने सांगितले.

तसेच श्रीनगरमधील एका फर्निचरवाल्याने या अधिकाऱ्यांच्या कमाईचा आणखी एक स्रोत उघड केला. ऑफिससाठी आणि अन्य गरजांसाठी फर्निचर विकत घेताना हे अधिकारी आमच्याकडून भरभक्कम कमिशन घेत असल्याचा दावा त्याने केला. ई-निविदा प्रक्रिया नसल्याने अधिकारी थेट येतात, दर्जापेक्षा कमिशनचा आकडा बघतात आणि फर्निचर घेऊन जातात, असे तो म्हणाला. बऱ्याचदा आमच्या नफ्यापेक्षाही कमिशनची रक्कम अधिक असल्याचेही त्याने सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी संबंधितांची चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन सीआरपीएफचे महानिरीक्षक रविदीप सिंह साही यांनी दिले आहेत .

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin