Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


कानपूरमध्ये दोन कारमधून १० कोटींच्या नव्या नोटा जप्त


Main News

कानपूर, दि. ११ (पीसीबी) - उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दोन वेगवेगळ्या कारमधून १० कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. नाकाबंदीदरम्यान कानपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यातील एक गाडी हमीरपूरला जात होती, तर दुसरी लखनऊला जात होती. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कानपूरमध्ये मंगळवारी दिवसभर वाहनांची तपासणी सुरु होती. यावेळी खासगी गाड्यांमध्ये कोट्यवधी रुपये सापडले.

या दोन्ही गाड्यांमधील लोकांकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे एवढी रक्कम जवळ बाळगण्याबद्दलची कोणतीही कागदपत्रे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी आयकर आणि निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भातील माहिती दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गाडीतून पैसे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी दहा कोटी रुपये जप्त केले आहेत. सर्वाधिक रक्कम अलाहाबाद बँक आणि अलाहाबाद ग्रामीण बँकांची असल्याचे कळते. आयकर विभागाचे अधिकारी तपास करत आहे. जप्त कलेली रक्कम बँक आणि व्यापाऱ्यांची असल्याचे सांगितले जात आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin