Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


व्हॉट्सअॅपमध्ये दोन नवे जबरदस्त फिचर्स


Main News

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) - जगप्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये जीआयएफ सपोर्ट सुरु केले होते. आता व्हॉट्सअॅपने जीआयएफशी संबंधित एक नवे फीचर आणले आहे. अँड्रॉईड बीटा व्हर्जन यूझर्ससाठी आता जीआयएफचे पर्यायही दिले जातील. जे तुम्ही सर्च करुन समोरच्या यूझर्सना पाठवू शकता. त्याचसोबत नव्या अपडेटमध्ये फोटो पाठवण्याची मर्यादा १० वरुन ३० करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅपच्या बीटा अँड्रॉईड 2.17.6 व्हर्जनचा वापर करणाऱ्या यूझर्सना नवे फीचर मिळणार आहे. लवकर ऑफिशियल व्हॉट्सअॅप यूझर्सनाही अॅप अपडेटनंतर या फीचरचा अनुभव घेता येणार आहे. जीआयएफ इमेज सर्च करण्याचा पर्याय यूझर्सना इमोजीच्या पर्यायावर क्लिक केल्यावर मिळेल. या फीचरच्या मदतीने यूझर्स आपल्या आवडीनुसार वेगवेगळे जीआयएफ चॅटिंगदरम्यान वापरु शकतात.

इमेज शेअरिंगमध्ये नवे अपडेट काय?

व्हॉट्सअॅपवरुन इमेज शेअर करताना याआधी एकावेळी केवळ १० इमेज शेअर करण्याची सुविधा होती. मात्र, आता ३० इमेज शेअर करणे शक्य होणार आहे. आता नव्या अपडेटमध्ये व्हॉट्सअॅप यूझर्सना दोन्ही नवे फीचर्स उपलब्ध होणार आहेत. सध्या बीटा अँड्रॉईड 2.17.6 व्हर्जन वापरणाऱ्यांनाच नव्या फीचरची सुविधा सुरु करण्यात आली आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin